World Cancer Day 2023 : दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' जगभर (World Cancer Day 2023) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश (World Cancer Day Purpose) लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणं. भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'. मात्र, आजही कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागृकता (Awareness about cancer) नसल्याचं दिसून येतं. कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण (cause of cancer) म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. प्राणघातक आणि धोकादायक आजाराबद्दल लोकांमध्ये जागृकता असणं आवश्यक आहे. (world cancer day 2023 date theme history significance 4 february latest health marathi news)
विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू (Death due to Cancer) होतोय. कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करता येऊ शकते. त्यासाठी कॅन्सरचं वेळीच निदान होणं गरजेचं आहे. आजही देशात कॅन्सरविषयी जागृकता नाही. गावोपाड्यात सामन्य लक्षण म्हणून याकडे पाहिलं जातं.
पॅरिस (Paris) येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषद आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा (Koichiro Matsuura) आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक (Jacques Chirac) यांनी पॅरिसच्या चार्टरवर (The Charter of Paris against Cancer) सही केली अन् त्या दिवसापासून हा दिवस साजरा होऊ लागला. कर्करोगाचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार, आरोग्य व्यावसायिक आणि सामान्य लोकांसह विविध भागधारकांना एकत्र आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
तीन वर्षांसाठी म्हणजे 2022, 2023 आणि 2024 साठी जागतिक कर्करोग दिनाची "क्लोज द केयर गैप" थीम आहे. म्हणूनच या वर्षीची थीम (World Cancer Day Theme 2023) देखील तिच आहे.
युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) त्याच्यातील सदस्य संस्थांना स्थानिक जागरूकता मोहिमा राबविण्यासाठी काम करतात. जागतिक जागतिक कर्करोग दिन संदेशाशी जुळवून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपकरणे आणि मार्गदर्शन देत असतात.
आणखी वाचा - Women Health : Sex नंतर महिलांच्या स्तनांमध्ये होतात 'हे' बदल
दरम्यान, बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण देखील वाढलंय. कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा आरोग्यावर (Health News) होऊ शकतो वाईट परिणाम होऊ शकतात. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणि पॅकेज फूड्स खाण्याने कर्करोगाचा आणि कर्करोगाने मृत्यू (Death from cancer) होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे जास्तीत जास्त असे पदार्थ खाणं टाळणं आवश्यक आहे.