मुंबई : बऱ्याचदा आपण न हलता एकाच ठिकाणी बसतो. अशावेळी आपले हात आणि पाय सुन्न होतात. अशावेळी हातापायांमध्ये मुंग्या येण्याची समस्याही जाणवते. पण तुमच्या शरीरात असं का होतं की तुम्ही व्यवस्थित असताना देखील तुमचे हात-पाय सुन्न होतात.
वैद्यकीय विज्ञानाच्या भाषेत याला प्रेस्टेशिया (Paresthesia) म्हणतात. हे बर्याचदा प्रत्येकासोबत घडतं आणि काही वेळानंतर हात आणि पाय यांची हालचाल होते, हातपाय परत सामान्य स्थितीत येतात आणि मुंग्या येणं देखील थांबते. कधीकधी पाय इतके सुन्न होतात की त्यांना उचलणे किंवा त्यांना हलवणं देखील कठीण होतं.
हात आणि पाय सुन्न होणं हे सामान्य आहे. जेव्हा आपण कोणत्याही हालचालीशिवाय बराच काळ त्याच स्थितीत राहतो किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर वजन टाकतो, तेव्हा त्या शरीराच्या भागाच्या नसा दाबल्या जातात. जेव्हा असं होतं, तेव्हा हात किंवा पायांपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह मंदावतो आणि ते त्या काळासाठी सक्रियपणे काम करणं थांबवतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्या भागाता मुंग्या येणं किंवा सुन्न पडल्याची परिस्थिती जाणवते.
शरीराच्या एखाद्या अवयवात मुंग्या येणं आपल्या मेंदूला सूचित करतं. आपण बर्याच काळापासून अवयवाची कोणतीही हालचाल केली नाही किंवा शरीराच्या भागावर अधिक वजन पडत असल्याचं समजतं. यानंतर, आपण शरीराची हालचाल करतो. काही वेळानंतर आपले हात आणि पाय सामान्य होतात. कधीकधी अशा वेळी शरीराची मालिश देखील केली जाते जेणेकरून रक्त प्रवाह सुरळीत होईल.
आपल्या शरीरात खूप छोट्या नसा असतात. ज्यांचं काम मेंदूला सिग्नल पाठवणं आहे. या नसा पेशी तंतूंनी बनलेल्या असतात, त्या प्रत्येकाचे कार्य विभागलं जाते की कोणती नस कोणता संदेश देईल. जेव्हा नसा संकुचित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन मंद होतं. त्यावेळी ते मेंदूला मुंग्या आलं असल्याचं सूचित करतात.
जर एखाद्या व्यक्तीचे हात, पाय किंवा शरीराचा इतर भाग अधिक सुन्न होत असेल तर त्याला थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अशा परिस्थितीत थायरॉईड, मधुमेह, स्ट्रोकमुळे शरीरात मुंग्या येण्याची समस्या जाणवू शकते.