मुंबई : वैवाहिक आयुष्य दीर्घायुषी होण्यासाठी पती-पत्नीमधील विश्वास आवश्यक आहे. अन्यथा नाते टिकणे कठीण आहे. नात्यात बऱ्याचदा एखादी छोटी गोष्ट देखील नातं उद्धवस्त करुन जाते. भारतात बहुतांश पुरुष हे बाहेर काम करतात आणि महिला या आपलं घर सांभाळतात. त्यामुळे जर आपण पाहिलं तर नवरा- बायको हे एकमेकांपासून 10 ते 11 तास लांब असतात. ज्यामुळे नात्यात दुरावा येणं सहाजिकच आहे.
आपला नवरा घरापासून बराच काळ बाहेर असल्यामुळे मग अनेक महिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि इथूनच नात्यात प्रॉबलम्स येण्यास सुरुवात होते.
परंतु एवढंच नाही तर अशी अनेक कारणं समोर आली आहेत, ज्यामुळे बऱ्याचदा बायका आपल्या नवऱ्यावर संशय घेतात. चला तर ही कारण जाणून घेऊ या.
तुमच्या लग्नाला काही महिने किंवा अनेक वर्षे उलटून गेली असली तरी, पती-पत्नीमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर आपापसात हे प्रकरण सोडवणे चांगले. व्यस्त जीवनामुळे पुरुष जर पत्नीशी कमी बोलत असतील तर यामुळे नातं बिघडतं. महिलांना अधीच नवऱ्याबद्दल संशय येत असतो, त्यात जर नवरा बायकोशी बोलला नाही किंवा जास्त गोष्टी शेअर केल्या नाही, तर बायकोला हे पक्कं होतं की, आपल्या नवऱ्याचं बाहेर संशय आहे.
मैत्री हे एक असे नाते आहे जे लग्नानंतरही टिकते, सहसा जेव्हा एखादा पुरुष स्त्री मैत्रिणीशी बोलतो तेव्हा अनेकदा त्याच्या बायकोला ते आवडत नाही. ज्यामुळे भांडणे वाढतात. यासाठी पतीने आपल्या पत्नीला खात्री देणे आवश्यक आहे की, त्यांचं नातं हे मैत्रीच्या पुढचं नाही.
नवऱ्याने घरी आल्यावर बायकोशी बोलावे आणि तिला वेळ द्यावा, तिच्याशी प्रेमाने बोलावे असे प्रत्येक बायकोला वाटते. परंतु अनेक पुरुष मोबाइललाच चिपकून राहातात, ज्यामुळे बायकोचा संशय अनेक पटींनी वाढतो. म्हणूनच पुरुषांनी घरी आल्यावर फोनवर बोलण्यात वेळ घालवू नये.
लग्नाआधी पुरुषांचे अनेक नातेसंबंध असू शकतात, परंतु लग्नानंतर त्यांनी सगळ्या गोष्टीसाठी आपल्या बायकोला महत्व द्यावं. तसेच तुम्ही जेव्हाही तुमच्या बायकोशी बोलत असाल, तेव्हा तुमच्या एक्सबद्दल काहीही बोलू नका.अन्यथा बायकोला असे वाटू शकते की तुम्ही तिला अजूनही मिस करत आहात आणि तिला विसरणे कठीण आहे आणि हे एक कारण तुमच्या नात्यात दुरावा तयार करण्यासाठी पुरेसं आहे.
त्यामुळे तुम्ही देखील अशी चूक करत असाल, तर ती आताच सुधारा.