हिवाळ्यात अनेकांना हिरव्या वाटाण्याची भाजी खाणं आवडतं. फक्त भाजीच नव्हे तर हिरव्या वाटाण्याचे पराठे, छोले असे अनेक प्रकार सेवन केले जातात. ही भाजी खाण्यासाठी चविष्ट असतेच, मात्र आरोग्याच्या दृष्टीनेही तिचे अनेक फायदे आहेत. ही भाजी कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मात्र या भाजीचं अतीसेवन करणं आरोग्यासाठी धोकादायकदेखील ठरु शकतं. त्यामुळे याचं अतीसेवन करणं टाळलं पाहिजे.
1) ज्या लोकांना अॅसिडीटीचा (acidity) खूप त्रास आहे, त्यांनी हिरव्या वाटाण्याचं सेवन कमी केलं पाहिजे. कारण वाटाणा लवकर पचत नाही, यामुळे तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते.
2) तसंच ज्या लोकांना किडनीसंबंधी त्रास आहे, त्यांनीही वाटाण्याचं सेवन करणं टाळावं. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्या कारणाने किडनीसंबंधी समस्या वाढू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
3) ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी हिरव्या वाटाण्याचं सेवन कमी केलं पाहिजे. यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेटचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.
4) याशिवाय हाय युरिक अॅसिड असल्यास हिरव्या वाटाण्याचं सेवन टाळलं पाहिजे. या भाजीत प्रोटीन, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं जे तुमचं युरिक वाढण्यास कारणीभूत ठरु शकतं.
(ही केवळ सामान्य माहितीवर उपलब्ध माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)