या उपायांनी कमी होईल केस दुभंगण्याची समस्या

  सध्याच्या हेअर टेण्ड्सनुसार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकजण हेअर कलर, ब्लीच तसंच अनेक नवनवीन प्रक्रिया केसांवर करत असतात. त्यामुळे केस कोरडे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्लिट इंडस येतात. (केसांना फाटे फुटतात.)

Updated: Dec 13, 2017, 10:42 PM IST
या उपायांनी कमी होईल केस दुभंगण्याची समस्या  title=

मुंबई :  सध्याच्या हेअर टेण्ड्सनुसार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकजण हेअर कलर, ब्लीच तसंच अनेक नवनवीन प्रक्रिया केसांवर करत असतात. त्यामुळे केस कोरडे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्लिट इंडस येतात. (केसांना फाटे फुटतात.)

तुमची हीच समस्या लक्षात घेऊन Advanced Hair Studio चे हेअर एक्स्पर्ट यांनी स्प्लिट इंडस व खराब झालेल्या केसांची काळजी घेण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत

एग मास्क 

अंड्याचा मास्क लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात, केसाचं कंडिशनिंग होतं. तसंच स्प्लिट एंड्सपासून सुटका होते. अंड्यात थोडं दही घाला. त्यामुळे केस तुटणार नाहीत. अधिक मजबूत आणि मुलायम होतील.

मोठ्या दातांचा कंगवा वापरा:

शाम्पू नंतर कंडिशनर लावल्यावर मोठ्या दातांच्या कंगवा पूर्णपणे गुंता निघेपर्यंत केसातून फिरवा. त्यामुळे केस सुकल्यानंतर विंचरताना तुटत नाहीत.

नियमित केस कापणे

नियमित केस कापणे हा स्प्लिट एंड्सपासून सुटका करण्याचा एकमेव पर्याय नसला तरी नियमित केस ट्रिम केल्याने स्प्लिट एंड्सला आळा घालण्याचा उत्तम पर्याय आहे. केस ट्रिम करण्यासाठी तुम्ही जितका वेळ घ्याल तितकं स्प्लिट एंड्स येण्याची संभावना अधिक वाढेल.