पोनिटेलमुळे केसांंचे नुकसान टाळण्यासाठी खास टीप्स

दीपिका पादुकोनचा पोनिटेल पाहून अनेकींनी आपल्या स्टाईलिंगमध्ये त्याचा वापर केला. सहज सोपी आणि एलिगंट स्वरूपाची ही हेअरस्टाईल  वेस्टर्न कपड्यांपासून फॉर्मल कपड्यांपर्यंत सहज कशावरही शोभून दिसतात. त्यामुळे तुम्ही पोनिटेल  बांधाणार असाल तर या काही चूका कटाक्षाने टाळा.  

Updated: Jan 3, 2018, 11:50 AM IST
पोनिटेलमुळे केसांंचे नुकसान टाळण्यासाठी खास टीप्स   title=

मुंबई : दीपिका पादुकोनचा पोनिटेल पाहून अनेकींनी आपल्या स्टाईलिंगमध्ये त्याचा वापर केला. सहज सोपी आणि एलिगंट स्वरूपाची ही हेअरस्टाईल  वेस्टर्न कपड्यांपासून फॉर्मल कपड्यांपर्यंत सहज कशावरही शोभून दिसतात. त्यामुळे तुम्ही पोनिटेल  बांधाणार असाल तर या काही चूका कटाक्षाने टाळा.  

बॅक कॉम्बिंग  

बॅक कॉम्बिंग केल्याने बाऊन्स मिळतो. परंतू या ट्रिकमुळे केस ब्रेक होऊ शकतात. वारंवार बॅक कॉम्बिंग केल्याने केस रफदेखील होतात. 

हाफ बन  

पोनिटेल तुम्हांला खुलून दिसत असेल तरीही नेहमीच त्याचा वापर करणं टाळा. यामुळे केसांचे नुकसान होते. त्याऐवजी तुम्ही हाफ बन बांधू शकता. 

केस नीट विंचरा 

केस विंचरताना काळजी घ्या. नीट केस न विंचरल्यास तुमच्या हेअरबॅन्डवर गळलेले केस अडकू शकतात.  

हेअर स्प्रे -  

हेअर स्प्रेचा वापर केल्यानंतर पोनिटेल अधिक नीट आणि दीर्घकाळ टिकून राहतो. त्यामुळे स्प्रेचा वापर करण्याचा मोह होतो. परंतू अतिवापरामुळे केस तुटण्याची शक्यता असते.  हेअर स्प्रे ऐवजी सेरमचा वापर करा.  

खूप  पिनांचा वापर  

खूप पिनांचा वापर करणं टाळा. पिना काढताना केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केस टाईट ठेवण्यासाठी वारंवार आणि अतिप्रमाणात पिनांचा वापर करू नका.