White Hair Problem: आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळं आणि उलट सुलट जेवणामुळं आणि जेनेटिक कारणांमुळं कमी वयातच केस पांढरे होतात. 25 ते 30 वर्षांपर्यंतच्या तरुणांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी पांढऱ्या केसांमुळं आत्मविश्वासही कमी होतो. पांढरे केस कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, त्यांचा काहीच फरक पडत नाही. नेमकं कशामुळं केस पांढरे होतात, हे तुम्हाला माहितीये का?
वय वाढत गेले की केस पिकण्याची समस्या होते. मात्र आजकाल लहान वयातही केस पिकण्याची समस्या दिसून येते. खरं तर केस पिकण्याची कारणे वेगवेगळी असू शकता. पण याचे मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमन सीची कमतरता. या न्यूट्रिएंट्सला एस्कॉर्बिक अॅसिड असंदेखील म्हणतात. हे न्यूट्रिएंट केस पिकण्यापासून रोखते. तसंच, केसगळतीही थांबते.
व्हिटॅमिन सीमुळं कोलेजनच्या उत्पादनास मदत मिळते. ज्यामुळं केस पांढरे होणे थांबते. त्याचबरोबर केस मजबूत होतात आणि कोरडेपणा निघून जातो. त्यामुळंच आरोग्य तज्ज्ञ नेहमी केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सीयुक्त जेवण जेवण्याचा सल्ला देतात.
व्हिटॅमीन सी अनेक फळ आणि भाज्यांमध्ये आढळले जाते. जर तुम्ही प्रत्येक दिवशी जवळपास 4 ग्रॅम न्यूट्रिएंट्सचं सेवन केल्यास मेंदूपर्यंत रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळं केसांसंबधित सर्व तक्रारी दूर करते आणि केसांची वाढ होते.
व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी तुम्ही या फळांचे सेवन करु शकता. ज्यामध्ये संत्र, चकोतरा, पेरू, जांभूळ, पपई यांचा समावेश आहे. तर, भाज्यांबाबत बोलायचे झाल्यास कोबी, ब्रोकोली, पालक आणि टॉमेटे खाल्ल्यानेही फायदा होतो. केसांना पोषण न मिळाल्यास केस पांढरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं केसांना पोषण मिळेल असा आहार घ्यावा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)