आयुर्वेदिक आहे म्हणून अती करू नका, जेवणात जास्त प्रमाणात हळद ठरेल धोकादायक?

जाणून घ्या, जास्त प्रमाणात हळद खाण्याचे परिणाम

Updated: Sep 2, 2022, 03:24 PM IST
आयुर्वेदिक आहे म्हणून अती करू नका, जेवणात जास्त प्रमाणात हळद ठरेल धोकादायक? title=

मुंबई : हळदीला भारतीय स्वयंपाकघरातील सगळ्यात लोकप्रिय मसाल म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही, जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीचे फायदे आपल्या सगळ्यां माहित आहेत. याचा आपल्या त्वचेला आणि आरोग्यासाठी फायदा होता, एवढंच काय तर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी मानली जात नाही, अनेकदा आपण काही दुखापत झाल्यास हळदीची पेस्ट लागलेल्या ठिकाणी लावतो. मात्र, जर आपण हळदीचा वापर हा गरजेपेक्षा जास्त केला तर त्याच्या आपल्या त्रास ही होऊ शकतो. (Turmeric Side Effects) 

आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर

ग्रेटर नोएडाच्या GIMS रुग्णालयात कार्यरत असलेल्या लोकप्रिय डायटीशियन डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितलं की हळदीच औषधी गुणधर्म असतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण कोणत्या ही गोष्टीचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यानं नुकसानही होऊ शकतं. चला तर जाणून घेऊया हळदीचे सेवन जास्त प्रमाणात का करायला नको...

आणखी वाचा : Sussanne Khan च्या ब्रालेट लूकवर Boyfriend अर्सलन गोनीनं फिदा, पण...

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहतो, परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केले तर पोटाच्या संबंधित समस्या किंवा चक्कर येऊ शकतात. तरुणांनी रोज एक चमचा पेक्षा जास्त हळदीचं सेवन करू नये. 

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

1. किडनी स्टोन
हळदीचे जास्त सेवन केल्यानं आपल्या किडनीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, कारण या मसाल्यामध्ये ऑक्सलेट नावाचे पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरात कॅल्शियम विरघळण्यात अडथळे निर्माण होतात आणि नंतर त्याचा गोळा होता आणि त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होतो. 

आणखी वाचा : तीन लग्न करणारा पवन कल्याण कोट्यवधींचा मालक; राजकारणतही सक्रीय...

2. उलट्या आणि अतिसार
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात. पोट खराब झाल्यास उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे हळद मर्यादेत खाणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)