पोटाच्या कर्करोगासाठी हळद फार उपयुक्त

कक्यूर्मा लॉन्गा (हळदी चे झाड) यांच्या मुळांमधून निघणाऱ्या करक्यूमिन पोटामध्ये होणाऱ्या कर्करोगास रोखण्यास मदत करतो. 

Updated: Apr 30, 2019, 08:25 AM IST
पोटाच्या कर्करोगासाठी हळद फार उपयुक्त title=

मुंबई : आपल्या दैनंदिन जीवनात हळदीचा वापर होत असतो. हळदीचा उपयोग फक्त स्वयंपाकासाठी नाही तर इतर कामांसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. हळद ज्या प्रमाणे जेवणाला चवदार बणवते त्याचप्रमाणे ती आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. फक्त किरकोळ आजारांसाठी हळद फायदेशीर नाही, तर गंभीर आजारावर सुद्धा हळद महत्वाची भूमिका बजावते. कक्यूर्मा लॉन्गा (हळदी चे झाड) यांच्या मुळांमधून निघणाऱ्या करक्यूमिन पोटामध्ये होणाऱ्या कर्करोगास रोखण्यास मदत करतो. 

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो (युनिफासएसपी) आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरा (यूएफओ) च्या संशोधकांनी ही माहिती ब्राझिलमध्ये प्रदान केली आहे. कर्क्यूमिन व्यतिरिक्त, हिस्टोन क्रियाकलाप सुधारित करण्यासाठी इतर यौगिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यात कोल्काल्सीफेरॉल, रेव्हरेट्रॉलोल, क्वार्सेटिन, गार्सनॉल आणि सोडियम बटायट्रेट (आहारातील फायबरच्या निषेधा नंतर आंतड्यातील बॅक्टेरियाद्वारे उत्पादित) यांचा समावेश असतो.

ग्लोबल कॅन्सर रिसर्च इंटरनॅशनलच्या पोटाच्या कर्करोगाच्या आकडेवारीनुसार, जागतीक पातळीवर प्रत्येक वर्षी एकूण ९ लाख ५२ हजार गॅस्ट्रिक कर्करोग्रस्त रूग्ण अढळले आहेत. ज्यामध्ये अंदाजे ७ लाख २३ हजार रूग्ण कर्कगोगाने बळी पडतात. म्हणजे एकूण ७२ टक्के रूग्ण या गंभीर आजाराचे शिकार होतात.    

भारत देशात पोटाचा कर्करोग झाल्याची रूग्णांची संख्या सुमारे ६२ हजार ऐवढी आहे. त्यांमध्ये ८० टक्के रूग्ण प्रत्येक वर्षी मृत्यू मूखी पडतात. याबाबतीत हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.के.के.अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 'पोटाचा कर्करोग हळू-हळू विकसीत होतो. त्यामुळे सुरूवातीला कोणतेही लक्षणे समोर येत नाहीत.' 

पोटाच्या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये भूक कमी लागणे, वजन कमी होणे, पोटात दुखणे, अपचन होणे, उल्टी होणे (रक्ताची उल्टी होण्याची शक्यता), पोटाला सुज येणे इ. यांपैकी काही लक्षणांवर रूग्ण तात्काळ उपचार घेतो. कारण हे लक्षणे दिसण्यात येतात. परंतू उपचारा नंतरही हे आजार कायम राहतात.

कर्करोगाच्या उच्च दराचे प्रमुख कारण म्हणजे, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. धूम्रपान करणे आजाराचे प्रमुख कारण आहे. पोटाच्या कर्करोगासाठी योग्य वेळी योग्य उपचार घेते महत्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पहिल्या काही वर्षांमध्ये ३ ते ६ महिने सतत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते, असे वक्तव्य डॉ. के.के. अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.