Morning Headache: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का, नेमके कारण काय ? तात्काळ करा हे उपाय

Morning Headache Reason: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते का? (Morning Headache) यानंतर दिवसभर थकल्यासारखे वाटते का? तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. 

Updated: Aug 30, 2022, 08:43 AM IST
Morning Headache: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का, नेमके कारण काय ? तात्काळ करा हे उपाय title=

मुंबई : Morning Headache Reason: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते का? (Morning Headache) यानंतर दिवसभर थकल्यासारखे वाटते का? तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. तुमचे शरीर डिहाइड्रेट (Dehydrate)झाले असले तरी तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय, जर तुम्हाला तणाव असेल तर हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. जर तुम्ही खूप दारु (Liquor)प्यायली असेल किंवा बराच वेळ उन्हात राहिलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तसे असेल तर तुम्ही सावध व्हावे. त्यासाठी काही उपाय जाणून घ्या. जे सकाळी उठल्यावर जी डोकेदुखी होते ती दूर होईल.

सकाळच्या डोकेदुखीपासून सुटका कशी मिळवाल?

जर तुम्हाला सकाळच्या डोकेदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनने काही टीप्स दिल्या आहेत, ज्याचे पालन केल्यास सकाळची डोकेदुखी टाळता येईल.

भरपूर झोप घ्या

जर तुम्हाला सकाळची डोकेदुखी टाळायची असेल तर 7-8 तासांची झोप नक्कीच घ्या. याशिवाय ठराविक वेळेत झोपा. रात्री उशिरापर्यंत जागू नका. रात्री लवकर झोपायला जा.

व्यायाम करा

सकाळी डोकेदुखीची तक्रार असेल तर रोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने सकाळी डोकेदुखीची तीव्रता आणि वारंवारता कमी होईल.

सकस आहार घ्या

जर तुम्हाला सकाळी डोकेदुखीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला निरोगी आणि सकस आहार घेतला पाहिजे. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवा. अधिकाधिक पाणी प्या.

डोकेदुखीसाठी डायरी ठेवा

जर तुम्हाला सकाळी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डायरी ठेवा. डायरीमध्ये लिहा की तुम्हाला किती वेळा डोकेदुखी होती आणि किती काळ. असे केल्याने, तुम्हाला डॉक्टरांकडून उपचार घेणे आणि त्यांना तुमची स्थिती सांगणे सोपे होईल.

ताण घेऊ नका

जर तुम्ही ध्यान आणि योगासन केले तर तुम्ही सकाळच्या डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. दररोज ध्यान आणि योगासने केल्याने तुमचे मन एकाग्र होईल. मन शांत राहील.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)