सावधान ! तुम्ही खात असलेली मिरची पूड भेसळयुक्त तर नाही ना? असं तपासून घ्या

तुमच्या स्वयंपाकघरात असलेली लाल तिखट भेसळयुक्त तर नाही हे वेळीच ओळखा.

Updated: Nov 13, 2022, 11:44 PM IST
सावधान ! तुम्ही खात असलेली मिरची पूड भेसळयुक्त तर नाही ना? असं तपासून घ्या title=

मुंबई : स्वयंपाकगघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल तिखट. कोणतीही भाजी किंवा डिशमध्ये लाल तिखट पूड घालणे सामान्य आहे. पण तुम्ही खात असलेली लाल मिरची पावडर ही लाल विटांची पावडर तर नाही ना? आपला नफा वाढवण्यासाठी अनेक दुकानदार अनेकदा फसवणुकीचे प्रकार करतात. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात असलेली लाल तिखट भेसळयुक्त तर नाही हे वेळीच ओळखा.

लाल मिरची पावडरमध्ये वाळू, खडू पावडर, वीट पावडर किंवा कोंडा मिसळला जातो. यानंतर, चमकदार लाल दिसण्यासाठी त्यात कृत्रिम लाल रंग टाकला जातो. जेणेकरून पावडर चमकदार लाल रंगाची दिसते आणि ग्राहक फसतात.

भेसळयुक्त लाल तिखट कसे ओळखावे

तुमच्या स्वयंपाकघरात असलेली भेसळयुक्त लाल मिरची पावडर खरी आहे की नाही हे ओळखण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा लाल तिखट घाला. जर ती पावडर पाण्यात विरघळली आणि पाण्याचा रंग खोल लाल रंगात बदलला तर त्यात भेसळ आहे हे समजून घ्या.

खरी लाल तिखट पाण्यात विरघळत नाही

लाल मिरची पावडर कधीही पाण्यात विरघळत नाही. ती वरट तरंगते. लाल रंगाची पूड हळूहळू पाण्यात बुडत असेल तर समजून घ्या की हा पिठाच्या चाळणीतून गाळलेला कोंडा आहे, जो जनावरांना चारा म्हणून दिला जातो. हा कोंडा पोटासाठी अत्यंत हानिकारक आहे.

पावडरमध्ये स्टार्चची भेसळ

तुमच्या लाल तिखटात स्टार्च आहे की नाही हे तपासण्यासाठी साधारण अर्धा चमचा तिखट घ्या आणि त्यात आयोडीनचे द्रावण किंवा टिंचर आयोडीनचे काही थेंब टाका. पावडरचा रंग निळा होऊ लागला, तर त्यात स्टार्च (भेसळयुक्त लाल मिरची पावडर) मिसळले आहे, हे समजावे. हा स्टार्च हानिकारक ठरु शकतो.

तुमच्या पावडरमध्ये विटांची पावडर

लाल मिरची पावडरमध्ये विटांचा भुसा किंवा वाळू मिसळलेली नाही ना. हे तपासण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल तिखट मिसळा. भिजवलेली तिखट तळहातावर घेऊन हलक्या हाताने चोळा. ती पावडर चोळताना तळहातावर जर खरबुडीत जाणवत असेल तर समजून घ्या की त्यात भेसळ आहे. त्यात वाळू किंवा वीट पावडर काहीही मिसळता येते.