पोर्तुगाल : पोर्तुगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेच्या अंडरआर्म्समधून दूध निघण्याची घटना घडलीये. या घटनेमुळे सर्वजण पुरते हैराण झाले होते. मात्र या घटनेच्या मागे वैज्ञानिक कारणंही आहे.
प्रसूतीनंतर, या महिलेला अंडरआर्म्समधून लिक्विड बाहेर येत असल्याचं जाणवलं. या दरम्यान, तिला वाटलं की घाम येत असेल, परंतु जेव्हा तिला वेदना जाणवल्या आणि तिने त्याची तपासणी केली त्यावेळी तिला ते थोडं संशयास्पद वाटलं. तातडीने ही महिला डॉक्टरांपर्यंत पोहोचली आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतून जे उघड झालं ते आणखी आश्चर्यकारक होतं.
या महिलेने तिच्या डॉक्टरांना सांगितलं की, तिला तिच्या उजव्या हाताच्या खालच्या भागात वेदना होत आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका नवीन अहवालानुसार, जेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, तेव्हा दाबल्यावर एक पांढरा द्रव बाहेर येऊ लागला. अहवालाचे लेखक आणि लिस्बन रुग्णालयाच्या डॉ. क्रिस्टियाना मारिन्हो-सोअर्स आणि डॉ. मारिया पुलिडो-व्हॅलेन्टे यांना आढळलं की हे द्रव म्हणजे आईचं दूध होतं.
पोर्तुगालच्या लिस्बन इथल्या रूग्णालयात सांता मारिया या डॉक्टरांनी महिलेला सांगितलं की, तिच्या शरीरात अतिरिक्त ब्रेस्ट टिश्यू (पॉलीमॅस्टिया) सापडला आहे. काळजी करण्यासारखं काहीही नसले तरी, पॉलीमास्टियामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगमध्ये अतिरिक्त टिश्यूचीही तपासणी केली जाते.
डॉक्टरांच्या मते, जगातील 6% महिलांना ही समस्या आहे. याला एक्सेसरी ब्रेस्ट टिश्यू देखील म्हणतात. एक्सेसरी ब्रेस्ट टिश्यूच्या बाबतीत, एक निप्पल किंवा एरोला देखील असू शकतात.
अहवालानुसार, गर्भाच्या विकासादरम्यान, स्तन ग्रंथी बनवणाऱ्या पेशी शरीराच्या दोन्ही बाजूंना काखेतून कंबरेपर्यंत रेषा बनवतात. सामान्यत: ही 'मेमरी रिज' किंवा 'मिल्क लाइन' पोटातील गर्भ वाढतेवेळी नाहीशी होते. ती फक्त स्तनांच्या आसपास असते. परंतु कधीकधी असं न घडून आणि मिल्क लाईन शरीराच्या इतर भागांमध्येही असते. ज्यामुळे extra breast tissue तयार होतात.