राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; एका आठवड्यात वाढले 25% रुग्ण

एक्टिव्ह रूग्णांची संख्या 95 हजारांच्या जवळ पोहोचली आहे.

Updated: Jun 28, 2022, 06:29 AM IST
राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; एका आठवड्यात वाढले 25% रुग्ण title=

मुंबई : देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसतेय. यामध्ये एक्टिव्ह रूग्णांची संख्या 95 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. ज्या वेगाने कोरोनाचा आलेख वाढतोय, त्यावरून देशात चौथी लाट आल्याचं मानलं जाऊ शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे चिंतेची बाब म्हणजे एका आठवड्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 17 हजार 73 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. या दरम्यान 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटीव्हीटी रेट 5.62% पर्यंत खाली आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 139 दिवसांनंतर, पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 2,369 नवीन रुग्ण आढळून आले आणि पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, संसर्गामुळे मृत्यूची सर्व प्रकरणं मुंबईत नोंदवली गेली आहेत. राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या आता 79,65,035 झाली असून मृतांची संख्या 1,47,910 वर पोहोचली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 1,402 लोक बरे झालेत. ज्यामध्ये राज्यात आतापर्यंत एकूण 77,91,555 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात 25,570 रुग्ण उपचार घेत आहेत.