मुंबई : अभिनेत्री रेखा, दीपिका पदूकोण असो किंवा गदी मराठी सिनेसृष्टीतील सई लोकूर, पूजा सावंत... या अभिनेत्रींना पाहिल्यानंतर त्याच्या पर्सनॅटीतील आकर्षक गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांची उंची. मुलींना आपली चांगली उंची असावी असे नेहमीच वाटतं. परंतू उंची ही वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच वाढते. त्यानंतर उंच दिसण्यासाठी तुम्हांला काही फॅशन टीप्स आणि ट्रिक्स वापराव्या लागतात.
उंच दिसण्यासाठी तुम्हांला हाय हील्स मदत करतात. मात्र हाय हील्सचा सतत वापर करणं आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. फक्त काही मर्यादीत वेळेसाठी तुम्हांला ही ट्रिक वापरायची असेल तर तुम्ही ब्लॉक हिल्सचा वापर करू शकता.
उंच दिसण्यासाठी काही विशिष्ट स्वरूपाचे कपडे घालणं तुम्हांला मदत करू शकतात.
काही वर्षांपूर्वी फॅशनमध्ये असणारे हाय वेस्ट पॅन्ट, प्लाझो तुम्हांला उंच दिसण्यासाठी मदत करतात. याकरिता हाय वेस्ट पॅन्ट, प्लाझोची मदत होऊ शकते.
आजकाल फ्लोअर लेन्थ अनारकली, गाऊन हे ट्रेडिशनल आणि ट्रेन्डी लूकमध्ये आजकाल सहज उपलब्ध असतात. त्यामुळे फ्लोअर लेन्थ अनारकली किंवा गाऊनसची निवड करा. मात्र ड्रेसच्या खाली फार जड एम्ब्रॉडरी नसेल याची काळजी घ्या .
बुटक्या मुलींना उंच दिसण्याचा प्रयत्न करायचा असेल तर लॉन्ग कुर्ता घालणं टाळा. त्याऐवजी हाय वेस्ट जिन्स पॅन्ट, प्लाझोवर क्रॉप टॉप घालू शकता.