कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी

दिलासादायक बातमी येत आहे. भारतात बहुचर्चित लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली

Updated: Sep 15, 2021, 07:01 PM IST
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी title=

मुंबई: जगभरात सर्वजण अजूनही कोरोनाशी लढा देत आहेत. लसीकरण वेगानं सुरू आहे. कोरोनावर अजूनही ठोस असं औषध मिळालेलं नाही मात्र एक दिलासादायक बातमी येत आहे. भारतात बहुचर्चित लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतात Sputnik V नंतर आता रशियाच्या अजून एका लसीला परवानगी मिळाली आहे. 

रशियाच्या Sputnik Light लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी भारतात परवानगी देण्यात आली आहे. कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की या लसीचा एक डोस कोरोना विरुद्धच्या लढाईत फायदेशीर असेल. याचा दुसरा डोस घ्यावा लागणार नाही. आता Sputnik V, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेणं अत्यवश्यक आहे. अशामध्ये ही लस एकाच डोसनंतर चांगलं काम करेल असा कंपनीने दावा केला आहे. 

मेडिकल जर्नल 'द लँसेट'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार स्पुतनिक लाइट ही लस 78.6 ते 83.7 प्रभावी ठरली आहे. इतर लसींच्या दोन डोसच्या तुलनेत ही लस प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

vaccine Sputnik Light या लसीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी तिसऱ्य़ा टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. ही लस आली तर एक उत्तम पर्याय असेल. आता भारतात लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे ही लस आता भारतात किती प्रभावी ठरते याकडे सर्वांचं लक्ष आहे.