मुंबई : गेल्या वर्षीच्या शेवटच्या दोन महिन्यांपासून थंड वारे वाहत होते आणि शहरात गारवा निर्माण झाला होता;
शहरातील लोकांनी हिवाळा ऋतूमधील थंडीचा अनुभव घेतला. उत्सवी सीजन संपून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि शहरातील तापमानामध्ये बदल झाला आहे. शहरातील तापमान अस्थिर बनले आहे. काल तापमान २ अंशांनी घटले आणि आठवड्याच्या शेवटापर्यंत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यातून फ्ल्यू होण्याची शक्यता बळावू शकते.
मुख्यत: रात्री व पहाटेच्या वेळी २१°से. पासून ३४°से. पर्यंत तापमानात सतत होत असलेल्या बदलामुळे अनेक मुंबईकरांना फ्लू आजार होत आहे. या आजाराने पीडित बहुतेक लोकांनी त्यांच्या डॉक्टरकडे घसा दुखत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. विविध वयोगटातील १५ ते २० टक्के मुंबईकर या आजाराने ग्रस्त आहेत. विशेषत शाळेत जाणारी मुले व तान्ह्या बालकांमध्ये हा त्रास आढळून आला आहे. या आजारामध्ये ऍलर्जी -हीनिटीस (नाक गळणे, ताप, शिंकणे व डोळ्यांतून पाणी येणे) आणि व्हायरल फैरिंजायटिस (गिळताना त्रास होणे, सर्दी व खोकला) या अॅलर्जी दिसून येतात.