तुम्हालाही Sitting Disease आहे का? यावर वेळीच मात करा, नाहीतर व्हाल गंभीर आजारांचे शिकार

Sitting Disease : एका जागी बसणं म्हणजे आजाराचंच एक रुप? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती आणि इतर बऱ्याच गोष्टी. अमाप पैसा कमवण्याच्या शर्यतीत आरोग्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.   

Updated: Apr 5, 2023, 11:13 AM IST
तुम्हालाही Sitting Disease आहे का? यावर वेळीच मात करा, नाहीतर व्हाल गंभीर आजारांचे शिकार  title=
Sitting Disease symptoms and remedies latest healt news in marathi

Sitting Disease : गेल्या काही वर्षांपासून नोकरदार वर्गाची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. कामाचे वाढलेले तास, काम करण्याच्या पद्धती या साऱ्यामुळं जीवनशैलीमध्ये हे बदल घडून आले आहेत. पण, या साऱ्यामध्ये आपण शारीरिक सुदृढतेकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत, हेसुद्धा तितकंच खरं. एकाच ठिकाणी तासन् तास बसून राहण्याची सवय लागल्यामुळं अनेकदा कामाच्या ठिकाणी अमूक एक कर्मचारी वेळ वाया घालवत नाही अशा शिक्का जरी बसत असला तरीही ही सवय फारशी चांगली नाही, हे लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. कारण, या सवयीमुळं तुम्ही Sitting disease चे शिकार होऊ शकता. (Sitting Disease symptoms and remedies latest healt news in marathi)

काय आहे Sitting disease? 

गाझियाबाद येथील हिलिंग ट्री रुग्णालयातील Physio Department च्या प्रमुख डॉ. इंद्रायणी उपाध्याय यांनी Sitting disease ला sedentary lifestyle syndrome असं म्हणतात असं स्पष्ट केलं. एकाच वेळी अनेक तासांसाठी बसून राहण्याच्या सवयीमुळं उदभवणाऱ्या शारीरिक अडचणींना हा आजार अधोरेखित करतो. शरीराजी अजिबात किंवा अतिशय कमी हालचाल करणं, वाढत्या वजनावर नियंत्रण न राहणं, टाईप 2 diabetes आणि हृदयरोगांना हा लहानसहान वाटणारा आजार बोलावणं धाडू शकतो. 

एकाच ठिकाणी तुम्हीही बराच वेळ बसताय? काही मुद्दे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा 

- व्यायाम करायला शक्य नसल्यास दैनंदिन कामांमध्ये शारीरिक हालचाली आणि तत्सम व्यायाम प्रकारांचा समावेश करा. जेवणाच्या विश्रांतीनंतर चालायला जाणं, काही सोपे व्यायाम प्रकार करणं यांचा यात समावेश आहे. 
- नोकरीच्या ठिकाणी लिफ्टनं न जाता शक्य असल्यास जिन्याचा वापर करा. दर दिवशी एक एक मजला वाढवत हे अंतर वाढवा. यामुळं तुमचं हृदय तंदुरूस्त राहील. 
- कामातून वेळ काढून बसल्या जागी काही stretching exercises करा. यामुळं शरीराची लवचिकता वाढेल, शिवाय स्नायूंचा व्यायामही होईल. पण, हे आवर्जून करा. 
- एकाच ठिकाणी अधिक वेळासाठी अजिबातच बसून राहू नका. कोणी काहीही बोलो, आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनं वेळोवेळी काम करता त्या ठिकाणहून उठा, उभे राहा, दूरवर पाहा, डोळे गच्च आवळून बंद करा आणि तितक्याच वेगानं उघडा. 

हेसुद्धा वाचा : Vitamin B ची कमतरता आहे? जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा कराल आहारात समावेश...

 

दररोजच्या कामाच्या वेळी काही सवयी अंगी बाणवल्याचा फायदा तुम्हालाही काही दिवसांनी दिसू लागेल. इथं आणखी एक बाब म्हणजे तुमची खुर्ची किंवला टेबलावर बसण्याची पद्धत. तुम्ही नेमके कसे बसता, पाठीला बाक काढून तर बसत नाही ना? हे प्रश्न स्वत:लाच विचारा. बसण्याची योग्य पद्धतही बऱ्याच अडचणींना दूर लोटते. 

सोप्या शब्दांत सांगावं तर, नोकरीचे तास कितीही असो दर एक तास किंवा 30 मिनिटांनी स्वत:ल विश्रांती द्या. जागेवरून उठा, पुरेसं पाणी प्या, आरोग्यदायी आहार घ्या. असं केल्यानं तुमच्या अर्ध्याहून अधिक अडचणी सहज हूर होतील.