मुंबई : घरच्या घरी सहज साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स आहेत, त्यामुळे दिवसाच्या थकव्यानंतर त्वचाला स्वच्छ करणे आवश्यक असते.
दिवसाच्या थकव्यानंतर त्वचाला स्वच्छ व पुनरूजीवीत करणे आवश्यक असते. त्यासाठी घरच्या घरी सहज साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स
चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य ते फेस वॉश अथवा क्लिंजिग वापरा.
चेह-यावरील छिद्र बुजवण्यासाठी क्लिंजिंग मिल्कच्या सहाय्याने चेहरा साफ करा.
चेह-याच्या त्वचेला सोसावेल इतकी गरम वाफ घ्या.
चेहरा थंड कऱम्यासाटी बर्फाने मसाज करा.
त्यानंतर फेस स्क्रबरने ८-१० मिनिटे चेहरा साफ करा.
चेहरा सुकल्यानंतर चेह-याला मध लावा जेणेकरून त्वचा उजळ होण्यास मदत होईल
चेहरा स्वच्छ धुवून आवडीनुसार फेस पॅक लावा
हळूहळू चेहरा सुकू द्या. सुकल्यानंतर त्याला टोनर लावा.
चेह-याला तजेला येण्यासाठी मॉईस्चराईजर लावा.