Pregnancy Tips: गर्भावस्थेत हिवाळ्यात 'हे' पदार्थ जरूर खा...बाळाच्या विकासासाठी ठरते अत्यंत लाभदायक

(winter diet plan for pregnancy) हिवाळ्यात बाजारात वाटाणा भरपूर प्रमाणात येतो. वाटाणे तुम्ही शिजवून किंवा कच्चेही खाऊ शकता. वाटण्याचं सेवन केल्याने पोटातील बाळाच्या मेंदू विकसनाला मदत होते

Updated: Jan 11, 2023, 04:01 PM IST
Pregnancy Tips: गर्भावस्थेत हिवाळ्यात 'हे' पदार्थ जरूर खा...बाळाच्या विकासासाठी ठरते अत्यंत लाभदायक title=

Preganancy Tips: गरोदरपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो .गरोदर राहिल्यावर नातेवाईक, डॉक्टर सर्वांकडून काळजी घेण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. आपण काय खावं, कसं खावं, किती प्रमाणात खावं इथपासून चालणं, बसणं उठणं या सर्वांवरच बंधन येऊन जातात. कारण आपल्या पोटात एक लहान जीव वाढत असतो,त्याला सर्व पोषक तत्व वेळेत मिलन अतिशय गरजेचं असत. आणि हेल्दी प्रेग्नन्सीसाठी सर्व गोष्टी अतिशय हेल्दी असणं खूप महत्वाचं असत. त्यामुळेच पोटातील बाळाची वाढ योग्यरीत्या होण्यास मदत मिळते.  (Pregnancy Diet In Winter)    
सध्या हिवाळा सुरु आहे.हिवाळा ऋतूत बाजारात ताज्या भाज्या आणि फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या मध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. आणि म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या डाएटमध्ये व्हेजिटेबल्सचा समावेश कारण खूप गरजेचं आहे, आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, गरोदरपणात हिवाळ्यात खाण्यायोग्य आणि पोषकतत्वांनी परिपूर्ण अश्या कोणत्या भाज्या आहेत.  (Pregnancy Diet In Winter) 

मसूर, मटर, फरसबी , छोले , सोयाबीन, यामध्ये असणारी तत्व गरोदरपणात शरियरला सर्वात जास्त लागणाऱ्या गरज भरून काढण्यात मदत करतात. यात फायबर,प्रोटीन, फॉलिक, कॅल्शियम,आयर्नचं प्रमाण जास्त असतं. (fibre, folic acid is very important in brain development of baby)
 
हिरवा वाटाणा

हिवाळ्यात बाजारात वाटाणा भरपूर प्रमाणात येतो. वाटाणे तुम्ही शिजवून किंवा कच्चेही खाऊ शकता. वाटण्याचं सेवन केल्याने पोटातील बाळाच्या मेंदू विकसनाला मदत होते .

कसूरी मेथी 

हिवाळ्यात कसुरी मेथी खावी. यात आयर्नचं प्रमाण भरपूर असतं. प्रेग्नसीमध्ये ऍनिमिया (anemia in pregnancy) होण्याचं प्रमाण जास्त असतं पण मेथी त्यापासून तुमचं रक्षण करते. यात फाइबर, प्रोटीन, विटामिन सी सारखे सर्वच पोषक तत्व असतात. शिवाय हिवाळ्यात बाजारात मेथी मोठ्या प्रमाणात आवक असते. 

रताळे

रताळ्यांमध्ये कार्बोहायड्रेटच प्रमाण मुबलक असतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. गरोदरपणातील थकवा दूर होण्यास खूप फायदेशीर आहे .   

अक्रोड 

ड्रायफ्रूट्स मध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं शिवाय व्हिटॅमिन सी सुद्धा असते, त्यामुळे हिवाळ्यात होणारे सर्दी पडसं (cold and cough in winter) होण्यापासून वाचण्यास मदत होते. त्यामुळे प्रेगनन्ट महिलांना मूठभर अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो.  (should eat this food for in winter during pregnancy for baby mental development growth)