या '४' गोष्टींचा वास कमी करेल उलटी, मळमळण्याचा त्रास

अनेकांना बस प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटते. अपचन, पित्त किंवा अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्येही रूग्णाला उलटीचा त्रास होतो. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 4, 2017, 09:16 PM IST
या '४' गोष्टींचा वास कमी करेल उलटी, मळमळण्याचा त्रास  title=

मुंबई : अनेकांना बस प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटते. अपचन, पित्त किंवा अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्येही रूग्णाला उलटीचा त्रास होतो. 

अनेकदा मनातून घाबरल्याने उलटी होण्याचा त्रास होतो, मळमळल्यासारखे वाटते. औषध घेऊन हा त्रास कमी होत नाही तर काही गोष्टींचा वास घेतल्याने हा त्रास थोड्या प्रमाणात आटोक्यात आणला जाऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

पहा उलटी किंवा मळमळण्याच्या समस्येवर काय कराल उपाय ? 

पुदीना 

पुदीन्याची पानं खाल्ल्यानं पचनाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच पुदीन्याचे तेल किंवा सुकी पानं हुंगल्याने मळमळ कमी होण्यास मदत होते.  

आलं 

पुदीन्याप्रमाणेच आलंदेखिल फायदेशीर आहे. मीठ लावलेला आल्याचा तुकडा चघळल्यास पित्ताचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच आल्याचं ऑईल किंवा सूंठ पूड हुंगल्याने त्रास आटोक्यात येण्यास मदत होते.  

लॅव्हेंडर 

लॅव्हेंडर ऑईल केवळ परफ्यूम किंवा शौकिनचा भाग नाही. त्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. लॅव्हेंडर ऑईल हुंगल्याने मळमळ किंवा उलटीमुळे वाढणारी बैचेनी आटोक्यात राहण्यास मदत होते.  

लिंबू  

लिंबूदेखील फायदेशीर आहे. पित्ताचा त्रास असणार्‍यांनी सायट्र्स फळांचा रिकाम्या पोटी आहार किंवा सेवन करू नये असा  सल्ला दिला जातो. पण लिंबाचा मंद सुगंध तुमचा त्रास कमी करण्यास मात्र मदत करू शकतो. लिंबाच्या सालीला हुंगल्याने त्रास आटोक्यात राहतो.