कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही?; 'या' आजारांचे असू शकतात संकेत

Reason For Excessive Thirst: कितीही पाणी प्यायलं तरीही तहान भागत नाही. ही जरी सर्वसामान्य समस्या वाटत असली तरी वेळेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2023, 01:29 PM IST
कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही?; 'या' आजारांचे असू शकतात संकेत title=
Reasons Why Youre Always Thirsty in marathi

Reason For Excessive Thirst: पाणी हे जीवन आहे. (Water Intake) शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तसंच, शरिरातील विषारी घटक पाणी बाहेर फेकते. त्यामुळं शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात तर सतत तहान लागते. उष्णतेमुळं शरीरातून जास्त घाम येतो त्यामुळं शरीरात पाण्याची कमतरता जाणवते अशावेळी जास्त तहान लागते. तहान भागवण्यासाठी आर्धा ते एक ग्लास पाणी पर्याप्त आहे. मात्र कितीही पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही. याचे कारण काय हे आज आपण जाणून घेऊया. (Excessive Thirst Reason)

जास्त तहान लागण्याचे कारण काय?

तुम्ही पाहिलं असेलच की तहान भागवण्यासाठी अनेकजण कित्येक ग्लास पाणी पितात. नाहीतर ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक याचेही सेवन करतात. इतकं करुनही घसा कोरडाच राहत असल्याचे जाणवते. अशी परिस्थिती उद्भवल्यास अजिबात हलगर्जीपणा करु नका. कारण हे लक्षण अनेक आजारांचे संकेत असू शकते. जाणून या अतिप्रमाणात तहान लागण्याचे कारण काय असू शकते, जाणून घ्या कारणे.

डिहायड्रेशन (Dehydration)

शरीरात जर आधीपासून पाण्याची कमतरता असेल तर एक दोन ग्लास पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशावेळी थोड्या-थोड्यावेळाने सतत पाणी पित रहा. 

तोंड सुके पडणे (Dry Mouth)

काही जणांच्या तोंडात सलाइव्हाची (Saliva) मात्रा कमी प्रमाणात असते. अशावेळी तोंड सारखं सुके पडते. म्हणून सतत पाणी पिऊनही तहान भागत नाही. 

मधुमेह (Diabetes)

मधुमेह हा असा एक आजार आहे ज्यामुळं अन् आजारांना आमंत्रण मिळते. मधुमेहच्या रुग्णांमध्ये एख लक्षण दिसते ज्यामध्ये त्यांना अतिप्रमाणात तहान लागते. त्यामुळं कितीही पाणी प्यायलं तरी त्यांचे समाधान होत नाही. 

फूड हॅबिड (Food Habits)

तुमच्या खाण्यात जास्त प्रमाणात जंक फूड्स किंना मसालेदार खाणं येत असेल तर सतत तहान लागते. 

अॅनिमिया (Anemia) 

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर या स्थितीला अॅनिमिया असं म्हणतात. अशावेळी शरीरात रेड ब्लड सेल (RCB कमी होतात. त्यामुळं कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही. 

एंग्जायटी (Anxiety)

हृदयाचे ठोके वाढणे, बैचेनी व जीव घाबराघुबरा होणे यालाच मेडिकल भाषेत एंग्जायटी असं म्हटलं जातं. या स्थितीमध्ये तोंड सुखू लागतं. ज्यामुळे तो व्यक्ती अधिक पाणी पिऊ लागतो