कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा महत्त्वाचा, डोनेट करण्यापूर्णी जाणून घ्या माहिती

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी

Updated: Apr 27, 2021, 08:43 PM IST
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा महत्त्वाचा, डोनेट करण्यापूर्णी जाणून घ्या माहिती title=

मुंबई : कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींना कोरोना झालेल्या व्यक्तींचे प्राण वाचवता येणार आहे. आपला प्लाझ्मा आयसीयूमध्ये दाखल झालेल्या कोरोना रूग्णाचे प्राण वाचवू शकतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, त्यातून हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.

प्लाझ्मा दान कसे करता येईल?

पहिली रक्तदात्याची चाचणी प्लाझ्मा थेरपीची असेल. त्याच्या रक्तामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग आहे की नाही हे चाचणीद्वारे दिसून येते. उदाहरणार्थ, एचआयव्ही किंवा हिपॅटायटी. जर रक्त ठीक असल्याचे आढळले तर त्याचा प्लाझ्मा काढून आयसीयूमधील रुग्णाला दिले तर तो बरे होऊ शकतो.

प्लाझ्मा कसे कार्य करते?

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये उपचारानंतर अँटीबॉडी रक्तात येतात. डॉक्टरांच्या मते, जर प्लाझ्मा त्याच्या रक्तातून काढून टाकला आणि कोरोना रूग्णाला दिला तर तो त्याला बरे होण्यास मदत करेल. अशाप्रकारे, एखाद्या आजारी रुग्णाला प्लाझ्मा देऊन त्यांना बरे करता येते. या एंटी-बॉडी रूग्णाच्या रक्ताबरोबर एकत्रितपणे कोरोनाशी लढण्यासाठी सामर्थ्य प्रदान करतात.

प्लाझ्मा दान कोण करू शकतात?

- कोरोनावर मात केल्यानंतर नेगेटिव्ह असलेले व्यक्ती

- कोरोनावर मात करुन 14 दिवस झाले आहेत

- प्लाझ्मा दान करण्यास निरोगी आणि उत्साहित वाटत आहे

- वय 18 ते 60 वर्ष

प्लाझ्मा दान कोण नाही करु शकत?

- ज्यांचे वजन 50 किलोपेक्षा कमी आहे

- ज्या स्त्रिया गरोदर आहेत.

- मधुमेह रुग्ण

- रक्तदाब 140 पेक्षा जास्त आहे

- ज्या रुग्णांना अनियंत्रित मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे

- कर्करोगाने बरे झालेले लोकं

- ज्यांना मूत्रपिंड / हृदय / फुफ्फुस किंवा यकृत रोग आहे.

नोबेल पारितोषिक विजेता जर्मन वैज्ञानिक एमिल वॉन बेयरिंग यांनी प्लाझ्मा थेरपीची सुरूवात केली होती. यासाठी त्यांनी ससा या प्राण्यामध्ये डिप्थीरिया विषाणू ठेवला, त्यानंतर त्यात अँटीबॉडीज टाकल्या. यानंतर या अँटीबॉडीज मुलांमध्ये टाकण्यात आली. म्हणूनच एमिलला मुलांचे तारणहार (सेवियर ऑफ चिल्ड्रेन) म्हटले जाते.