मुंबई: भारतासारख्या देशात परंपरांची काहीच कमी नाही. प्रत्येक राज्यातच नव्हे तर, प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला काही ना काही परंपरा ही नक्कीच दिसेल. आंध्र प्रदेशातील हैंदराबादमधील नामपल्लीतही अशीच एक परंपरा पाळली जाते. इथे एका विशिष्ट आजारावर मेडिकल ट्रीटमेंट घेण्याऐवजी चक्क माशांकडून उपचार करून घेतले जातात. या 'फिश ट्रीटमेंट'बद्धल ऐकून सगळे अवाक होतात. पण, हे सत्य आहे. इथल्या लोकांना 'फिश ट्रीटमेंट'वर फार भरवसा आहे.
'फिश ट्रीटमेंट'मध्ये चक्क आजारी लोकांच्या तोंडात मासा घालून उपचार केला जातो. या उपचारपद्धतीला 'फिश ट्रीटमेंट' म्हटले जाते. तसेच, या उपचारपद्धतीला अनेक लोक पसंतीही देतात. ही उपचारपद्धत प्रामुख्याने दम्याचा त्रास असलेल्या लोकांवर वापरली जाते. हे उपचार करून घेण्यासाठी भारताली अनेक ठिकाणांहून या ठिकाणी येतात. या उपचार पद्धतीसाठी सुमारे पाच सेंटीमीटर (२ इंच) लांबीचा मुरेल प्रजातीचा मासा रूग्णाच्या गळ्यात घातला जातो. हा प्रकार दिसायला फारच विचित्र दिसतो.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, 'फिश ट्रीटमेंट' केली जाते तेव्हा रूग्णाचा गळा पूर्णपणे स्वच्छ होत असल्याचा दावा केला जातो. गळा स्वच्छ झाल्यामुळे रूग्णाला श्वास घेताना होणार त्रास कमी होतो असे सांगतात. ही उपचारपद्धती केवळ बैथिनी गोड परिवारातील लोकांकडूनच केली जाते. बैथिनी गोड परिवार आपल्या या उपचारपद्धतीचा फॉर्म्युला इतर कोणालाही सांगत नाही. मात्र, या उपचाराने रूग्णास आराम मिळतो, असे सांगतात.