मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या आई वडीलांचं खास स्थान असतं. मग 'मदर्स डे', 'फादर्स डे' असा केवळ एकच दिवस सेलिब्रेट का करावा? या मुद्द्यावर खूप चर्चा होते. पण मदर्सचं औचित्य साधून तुम्ही किमान त्या एका दिवशी ती करत असलेल्या 'थॅंकलेस जॉब'बददल कृतज्ञता नक्की व्यक्त करू शकता.
आई आणि त्यातही ती गृहिणी असेल तर तिच्या या कामातून 'आई' कधीच रिटॅअर्ड होत होत नाही. मग 'मदर्स डे'चं औचित्य साधून तुम्ही तिचं काम थोडं हलकं करण्यासाठी यंदाच्या मदर्स डेला ही गिफ्ट्स नक्की देऊ शकता. यंदाचा मदर्स डे 13 मे 2018 रोजी जगभरात साजारा करण्यात येणार आहे. मग यंदाच्या रविवारी तुम्ही तिचा दिवस खास बनवण्यासाठी ही गिफ्ट्स नक्की देऊ शकता.
तुमच्यासाठी वेळी अवेळी, तुमच्या आवडीनुसार आई नेहमीच पदार्थ बनवते. पण यंदाच्या मदर्स डेला आईसाठी खास जेवणाचा, ब्रेकफास्टचा प्लॅन करा. याद्वारा तुम्ही तिला नक्कीच एक सरप्राईज गिफ्ट देऊ शकाल. तुम्ही फारसा वेळ एकत्र घालवत नसाल तर तुमच्या आईला घराबाहेर घेऊन जा. आवडत्या हॉटेलमध्ये ट्रीट द्या.
आई अनेकदा तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. मग यंदा 'मदर्स डे'चं औचित्य साधून तुमच्या आईला जीमची, फीटनेस क्लबची किंवा किमान योगा क्लासची मेंबरशीप घेऊन द्या.
सतत कामाच्या रगाड्यात अडकलेल्या तुमच्या आईला ती किती सुंदर आहे याची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी ब्युटी ट्रीटमेंटची मदत घ्या. तिला आवडीनुसार उत्तम दर्जाची हर्बल ब्युटी प्रोड्ट्स गिफ्ट्स द्या.
सतत कामामध्ये व्यस्त असलेल्या तुमच्या आईला किमान या एका दिवसासाठी आराम मिळवून देण्यासाठी स्पा किंवा सलोनमध्ये रिलॅक्स वाटावे म्हणून एखादी ट्रीटमेंट गिफ्ट म्हणून द्या.
आई आरोग्याकडे स्वतःहून कधीच लक्ष देणार नाही. त्यामुळे 'मदर्स डे' चं औचित्य साधून तिच्यासाठी नक्की हेल्थ चेकअप करण्यासाठी अपॉंईटमेट घेऊन ठेवा. तुम्ही स्वतःहून आईला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जा.
स्वयंपाकघरात असो किंवा मुलांच्या मागे होणारी धावपळ असो स्त्रिया खूपवेळ उभ्या असतात. सतत उभं राहिल्याने पायांवर ताण येतो. यामध्ये चुकीचे चप्पल वापरल्याने हा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे तिला मॉर्निंग वॉकला किंवा सतत प्रवास हा तिच्या कामाचा भाग असेल तर पायांचे दुखणे कमी करण्यासाठी ती वापरत असलेली चप्पल योग्य आहे का? हे पहा आणि तिला चांगले वॉकिंग शूज गिफ्ट करा.