पुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे

या सर्व्हेच्या निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते.

Updated: May 19, 2018, 12:33 PM IST
पुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे title=

मुंबई: महिला आणि पुरूष यांच्यात एकमेकांबद्धल आसलेल्या आकर्षणाबाबत नेहमीच काही ना काही संशोधन सुरू असते. यात पुरूष हे महिलांकडे का आकर्षित होतात? महिलेच्या व्यक्तिमत्वातील नेमका कोणता घटक पुरूषांना आवडतो. यांसारखे अनेक मुद्दे चर्चिले जातात. पण, संशोधक अभ्यासकांनी याच विषयावर अभ्यास करून एक नवाच मुद्दा समोर आणला आहे. पुरूषांच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या घटकाकडे (खरेतर कोणत्या प्रकारच्या पुरूषांकडे) महिला आकर्षीत होतात, असा तो सर्वेहोता. तर, शारीरिक उंचेने खूपच उंच असलेल्या नव्हे पण, लांब पायांच्या (पायाची पिंढरी ते कमरेपर्यंतचा भाग) पुरूषांकडे महिला अधिक आकर्षीत होतात, असे या सर्वे अहवालात म्हटले आहे.

ऑनलाईन पद्धतिने केला सर्व्हे

यूनिवर्सिटी ऑफ केंब्रीजमध्ये झालेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासगटाचे उप-प्रमुख थॉमस वर्सलुय्ज यांनी माहिती देताना सांगितले की, हा सर्वेऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यात अमेरिकेतील ८०० महिलांनी सहभाग घेतला बहुतांश महिलांनी इतर पुरूषांच्या तुलनेत पाय काहीसे लांब असणाऱ्या पुरूषांना पसंती दिली. पण, पाय अधिकच लांब असणाऱ्या पुरूषांना मात्र महिलांनी नाकारले.

१९ ते ७६ वयोगटातील महिलांचा सर्वेत सहभाग

या अभ्यासासाठी संशोधकांनी १९ ते ७६ वर्षे वयोगटातील युवती आणि महिलांचे वेगवेगळे गट केले. या गटांतील महिलांना काही पुरूषांचे कॉम्प्यूटर जनरेटेड फोटो दाखवले. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, यातील कोणता पुरूष तुम्हाला जास्त अॅक्टीव्ह वाटतो आणि तो तुम्हाला अधिक आकर्षीत करतो. छायाचित्रातील सर्व पुरूषांमध्ये हात आणि पायांच्या लांबीत किरकोळ अंतर होते. सर्वेतील महिलांनी सरासरी लांब पायांच्या पुरूषांना पसंदी दर्शवली.

पायांच्या लांबीची  सेक्शुअल सिलेक्शनमध्ये मोठी भूमिका

या सर्वे निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते. अभ्यासानुसार क-ऑर्थर थॉमस सांगतात की, हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, ही एक प्रक्रिया आहे आणि ती मानवाच्या उत्क्रांतीपासून चालत आली आहे. यात आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयीही समाविष्ठ आहेत.