पुरुष की महिला, हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका कोणाला? संशोधनातून समोर आली माहिती

Heart attack Symptoms and causes : सध्या आजुबाजूला कोणत्या आजारपणामुळे निधन झाले असं विचारलं तर, सर्वात आधी ऐकालयं येतं ते म्हणजे हार्ट अटॅकमुळे निधन झालं. हार्ट अटॅकचे नेमके कारण काय? पुरुष की महिला, हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका कोणाला? जाणून घ्या सविस्तर..

श्वेता चव्हाण | Updated: Feb 21, 2024, 05:19 PM IST
पुरुष की महिला, हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका कोणाला? संशोधनातून समोर आली माहिती title=

Heart Attack Symptoms for Men and Women in Marathi : जीवनशैलीत बदल झाला की त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येतात. ह्रदयावरचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे ह्रदयरोगाचे प्रमाण देखील वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक या विविध आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. कोरोना महामारीनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहितीय का महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आहे.

पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक

हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, महिलांपेक्षा कमी वयात पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लिंगानुसार हृदयाच्या समस्यांचा धोका अनेक घटकांवर अवलंबून असतो. बहुतांश अभ्यासातून असे दिसून आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. पुरुषांमध्ये, धूम्रपान आणि तणाव यासारख्या सवयींमुळे धोका वाढतो असे मानले जातं. तसेच सेवानिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.

पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी लक्षणे 

जीवनशैली आणि आहाराच्या सवयींच्या वाढत्या समस्यांमुळे महिला किंवा पुरुष दोघांनाही गंभीर आजारांपासून सुरक्षित मानले जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. हृदयविकाराच्या जोखमीचे घटक समजून घेणे आणि प्रतिबंध करणे महत्वाचे आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की,  हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये भिन्न असू शकतात. हृदयाविकाराचा झटका आल्यास महिलांना मळमळ, चक्कर येणे आणि थकवा यासारखी असामान्य लक्षणे दिसू शकतात. दुसरीकडे, छातीत दुखणे, गरम होणे, जबडा दुखणे यासारख्या समस्या पुरुषांमध्ये अधिक दिसतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील असमानतेवर अधोरेखित केले असून पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर एका वर्षाच्या आत, स्त्रियांचा जगण्याचा दर पुरुषांपेक्षा कमी असतो. ज्या महिलांना पाच वर्षांच्या आत पहिला हृदयविकाराचा झटका आला त्यांना मृत्यूचा धोका 47% वाढला होता. 

स्त्रियांचे हृदय पुरुषांपेक्षा लहान असते

महिलांच्या हृदयाचा आकार पुरुषांपेक्षा लहान असतो. त्यांच्या धमन्या विस्तारलेल्या आहेत. हृदयाला चार कक्षांमध्ये विभागणाऱ्या भिंती पातळ आहेत. याच कारणामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा धोका असतो. तरीही, हृदयविकाराच्या बहुतेक प्रकरणांमध्ये महिलांचा समावेश नाही. याची कारणेही नेदरलँड्स हार्ट जर्नलच्या अहवालात आढळून आली आहेत. महिलांमध्ये हृदयविकाराच्या समस्या शोधून त्यावर उपचार करण्यासाठी पुरेशी पावले उचलली जात नसल्याची नोंद आहे. याची जाणीव महिलांनाच नसते. केवळ कोरोनरी अँजिओग्रामसारख्या चाचण्यांमध्ये महिलांच्या हृदयाच्या धमन्या सहज शोधल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत, स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण कमी होते.