Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक

Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या... 

Updated: Jun 5, 2023, 03:10 PM IST
Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक title=
Mango for Weight Loss tips

Mango for Weight Loss tips in Marathi : अनेकजन वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कोणी वजन वाढण्याच्या भीतीने खाणेच सोडून देतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. असे केल्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. कारण बऱ्याचवेळेला वजन कमी करण्याच्या नादात काही लोक चुका करतात त्यामुळे हवा तसा फरक जाणवत नाही, मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमचे आवडते फळचं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. केवळ फळाची खाण्याची योग्य पद्धत असणे गरजेचे आहे. 

उन्हाळा सुरु होताच एकाचं फळाचे वेध लागते तो म्हणजे आंबा...आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढे चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर. आंबामुळे वजन कमी होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. आंब्यात फायबर, व्हिटॅमिन सी, कोपर, फोलेट, व्हिटॅमिन ए, ई, बी5, आणि बी6. तसेच, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. केवळ आंबा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येणार आहे. 

आंबामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. एक कप चिरलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरीज, 1.4 ग्रॅम प्रथिने, 25 ग्रॅम कार्ब, 22.5 ग्रॅम साखर, 2.6 ग्रॅम फायबर, 67% व्हिटॅमिन सी, 18% फोलेट, 10% व्हिटॅमिन ए आणि 10% व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य पद्धता माहित असणे गरजेचे आहे. 

वजन कमी करण्यासाठी आंबा खाण्याची योग्य पद्धत

आंब्याचे सेवन कमी करा (Reduce mango intake)

आंबा हा मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबरने परिपूर्ण आहे. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही तुम्ही ते खाऊ शकता. पण ते मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात.

रात्रीच्या जेवणानंतर खाऊ नका (Do not eat after dinner)

रात्रीच्या जेवणानंतर कधीही आंबा खाऊ नका.  यामुळे तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात. आंबा नेहमी दुपारी खावा. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आंब्याचे नाश्ता म्हणून सेवन करु शकता.

स्नॅक म्हणून खा (Eat as a snack)

जर तुम्ही एक कप आंबा नाश्ता म्हणून खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आंब्यामध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय अंबा उर्जा वाढविण्याचे काम करते. व्यायामापूर्वीचे आंबा खाणे खूप फायदेशीर आहे.

आंब्यांचा रस न खाता तसाच खावा (Eat mangoes as they are without juice)

आंब्याचा रस किंवा मँगो शेक बनवण्याऐवजी आहे तसा खावा. रस बनवल्याने आंब्यातील सर्व फायबर नष्ट होतात.

 

 

 

( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )