Lucky Mole : शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या

शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात खुप भाग्यवान, तुम्हाला माहितीय का? 

Updated: Oct 20, 2022, 05:28 PM IST
Lucky Mole : शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या title=

मुंबई : प्रत्येकाच्याच शरीरावर तीळ (Lucky Moles) असतात. या प्रत्येक तीळाचं एक वेगळा अर्थ सामुद्रिक शास्त्रात (samudrik shastra) सांगितला आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर तीळ असणे अनेक शुभ आणि अशुभ संकेत देत असतात. हे तीळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. आज आपण महिला आणि मुलींच्या शरीराच्या त्या भागांवर असणाऱ्या तीळाविषयी (Lucky Moles)  जाणून घेऊयात.

शरीराच्या 'या' भागावर तीळ 

कपाळावर तीळ 

अनेक महिलांच्या कपाळावर तीळ (mole on forehead) असते. समुद्रशास्त्रानुसार (samudrik shastra) ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असते, ते खूप भाग्यवान असतात. अशा महिला स्वतःहून उच्च दर्जा प्राप्त करतात. त्या आत्मविश्वासाने भरलेले असतात. तसेच आयुष्यात त्या भरपूर संपत्ती कमावतात.

मानेवर तीळ 

ज्या मुलींच्या मानेवर तीळ (Mole on the neck) असतो, त्या आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण करतात. या मुली कधीच धीर सोडत नाहीत आणि खंबीरपणे उभ्या राहतात. अशा मुली गरीब कुटुंबात जन्म घेऊनही अफाट संपत्तीची मालकिन बनतात.ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळते.

हनुवटीवर तीळ

अनेक महिलांच्या हनुवटीवर तीळ (Mole on chin) असते. हे तीळ खुप शुभ मानले जाते. अशा स्त्रिया सुंदर असतात, सहज सर्वांना मोहित करतात. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते. त्यांना कशाचीही कमतरता नसते आणि त्यांना जीवनात संघर्ष करावा लागत नाही.

कंबरेवर तीळ

स्त्रीच्या कंबरेवर तीळ (mole on the waist) असणे हे श्रीमंत असल्याचे दर्शवते. अशा स्त्रियांना अपार संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य मिळते आणि ते राणीसारख आय़ुष्य जगतात. त्या कोणत्याही क्षेत्रात गेल्या तरी त्यांना खूप नाव आणि यश मिळते.

खांद्यावर तीळ

ज्या महिला अथवा मुलीच्या खांद्यावर तीळ (Mole on shoulder) असते, त्या महिला लक्झरी आयुष्य जगतात.अशा महिलांना आलिशान सुविधा मिळतात. त्या चांगल्या मनाच्या आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. अशा महिलांना आयुष्यात खूप सन्मान मिळतो.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)