सावधान! तुम्ही रात्री उशिरा जेवता..वाढतोय मृत्यूचा धोका

लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे , रात्री उशिरा जेवल्याने..

Updated: Oct 22, 2022, 04:01 PM IST
सावधान! तुम्ही रात्री उशिरा जेवता..वाढतोय मृत्यूचा धोका title=

late night eating disadvantage:  वेळेवर जेवण करावे असा आपल्याला नेहमी सांगितलं जात पण कामाच्या बदलत्या वेळा, आपली धावपळ  कामाचा तणाव (work stress) या सर्वांमुळे बऱ्याच वेळा आपण वेळेवर जेवत नाही.  कामात अडकून राहतो आणि जेवणाची वेळ निघून जाते तरी आपण जेवत नाही. आणि मग या सर्वांचा परिणाम शरीरावर हळू हळू दिसू लागतो. अनेक आजार जडू शकतात आणि एकूणच आरोग्य बिघडू शकतं. 

आहाराची पौष्टिक गुणवत्ता, सेवनाची वेळ आणि त्याची पद्धत याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.  शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी जेवणाची वेळ ठरवलेच पाहिजे आई त्याच वेळेत जेवण खूप महत्वाचं आहे.  मुख्यतः रात्री ठरलेल्या वेळी जेवणं खूप महत्वाचं आहे आणि जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे . रात्री नेहमीच उशिरा जेवत असाल तर गंभीर आणि जीवघेणे आजार होण्याचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (late night eating is very dangerous disadvantages of it are worst)

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे , रात्री उशिरा जेवल्याने कॅलरीजचे प्रमाण, चयापचय आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते. 

रात्री उशिरा जेवण केल्याने आपण फार हालचाल करत नाही त्यामुळे जेवण पचत नाही  शिवाय कॅलरीज सुद्धा बर्न होत नाहीत  ऍडिपोज टिश्यूमध्ये बदल होतो. आणि एकूणच या सगळ्या सवयीनमुळे लाठपणा वाढतो जो अतिशय घातक आहे.(late night eating is very dangerous disadvantages of it are worst )