गरम पाणी किती आणि कधी प्यावं ? जाणून घ्या..नाहीतर होईल पश्चाताप

थंडीच्या मोसमात सर्दी किंवा घसादुखीमुळे लोक गरम पाण्याचे सेवन करतात. तसेच कोरोनामुळे अनेकांनी गरम पाणी पिण्यास जास्त सुरुवात केली आहे. पण,

Updated: Nov 7, 2022, 06:37 PM IST
गरम पाणी किती आणि कधी प्यावं ? जाणून घ्या..नाहीतर होईल पश्चाताप title=

health tips: मानवी शरीरात ७० टक्के पाणी असतं, शरीराला पाण्याची खूप गरज आहे. दिवसातून कमीतकमी ३ लिटर पाणी पिन हे अत्यंत गरजेचं आहे.  पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत.

भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिक बाहेर पडतात. परिणामी आपण निरोगी राहण्यास मदत होते. 

थंडीच्या मोसमात सर्दी किंवा घसादुखीमुळे लोक गरम पाण्याचे सेवन करतात. तसेच कोरोनामुळे अनेकांनी गरम पाणी पिण्यास जास्त सुरुवात केली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, जास्त गरम पाणी प्यायल्यानेही शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गरम पाण्याचा वापरही मर्यादेत आणि अनेक गोष्टी लक्षात ठेवूनच केला पाहिजे, अन्यथा तुम्ही ज्याचा औषध म्हणून वापरत करतायत, त्याचा उलटा परिणाम तुमच्या शरीरावर शकतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

अशावेळी, कोणत्या परिस्थितीत गरम पाणी पिऊ नये आणि कोणत्या परिस्थितीत हे पाणी शरीरासाठी चांगले आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला गरम पाण्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

पाणी गरम करून प्यायल्यास त्याचे आणखी फायदे शरीराला मिळतात,गरम पाणी प्यायल्याने त्याचे आणखी वेगळे फायदे शरीराला मिळतात. मात्र गरम पाणी किती आणि कधी प्यावं याकडेसुद्धा लक्ष दिल गेलं पाहिजे चला जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे फायदे  

  पचनक्रिया सुधारेल 
 (Digestion System)

पचनक्रिया सुधारण्यासाठी गरम पाण्याचा खूप फायदा होतो मेटाबॉलिजम वाढवून पचनक्रिया सुधारण्यास गरम पाणी खूप फायदेशीर आहे शरीरातील हानिकारक बॅक्टरीया मारण्याचं काम गरम पाणी करत. 
   
हृदयाचं आरोग्य सुधारत 
(Heart Problems)

काहींच्या मते रोज कोमट पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल(Cholesterol) कंट्रोलमध्ये राहत आणि परिणामी हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते  

सर्दी ताप आणि घसादुखीवर रामबाण 

गाला खराब असेल तर गरम पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या केल्यात तर आराम मिळतो  घशाची  सूज कमी होते कोमट पाणी पाययल्याने घास बसला असेल तर तो ठीक होतो सर्दी पडसं असेल तर त्यातूनही आराम मिळतो  

वजन कमी होण्यास मदत  (Weight Loss)
दररोज गरम पाणी प्यायल्याने एक्सट्रा फॅट्स कमी होऊन वजन नियंत्रित होण्यास नक्कीच फायदेशीर असेल