Health Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब?

Tight Jeans Effects on Health: आपल्या जीवनात आता जीन्स, डेनिमचं (denim) महत्त्व खूप वाढू लागलं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण जीन्स ही वापरतोच वापरतो. आपल्याला ऑफिसाला जायला जीन्स कम्फर्टेबल वाटतात.

Updated: Dec 15, 2022, 06:41 PM IST
Health Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब? title=
jeans news

Tight Jeans Effects on Health: आपल्या जीवनात आता जीन्स, डेनिमचं (denim) महत्त्व खूप वाढू लागलं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण जीन्स ही वापरतोच वापरतो. आपल्याला ऑफिसाला जायला जीन्स कम्फर्टेबल वाटतात. कुठल्या टॉप किंवा पार्टीवेअर लुकसाठीही आपण जीन्सचा हमखास वापर करताना दिसतो. तेव्हा आपल्यासाठी जीन्सचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अनेकांना त्यातूनही लूझ आणि टाईट अश्या दोन्ही प्रकारच्या जीन्स घालायला आवडतात. त्यातूनही टाईट जीन्स घालण्याची अनेकांना सवय असते. परंतु तुम्हाला माहितीये का की टाईट जीन्स (tight jeans) घालणं तुम्हाला फार महागात पडू शकतं. टाईट जीन्स घातल्यावर तुमच्या प्रायव्हेट पार्टला (private part) त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया टाईट जीन्स घालण्याचे परिणाम काय आहेत? (know the bad health effects on your body for wearing tight jeans more frequently)

सध्या आपल्या सर्वांनी सेक्सी लुक हवा अशतो त्यामुळेच टाईट जीन्स घालण्याचा फंडा सध्या सगळीकडेच जोर धरतो आहे. मुलीच नाही तर मुलंही टाईट जीन्स घालतात. आजकाल लुझ कपड्यांची फॅशन मुलांमध्ये दिसत असली तरी अनेकांना टाईट जीन्स घालण्याची सवय असते. परंतु टाईट जीन्स घातल्यानं तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे दिवसभर टाईट जीन्स घालणं हे आरोग्याला घातक आहे त्यानं वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. असं म्हणतात की जास्त तासांसाठी टाईट जीन्स घातल्यानं वेगवेगळे आजार उद्भवतात. त्यातून रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका उद्भवू शकतो. पुरूषांवर आणि महिलांवर(health effects on women) याचा विपरित परिणाम होतो. 

हेही वाचा - Video: लग्नाला वर्ष झाल्यानंतरही Katrina Kaif का लपवतेय 'ती' गोष्ट? नेटकऱ्यांचा सवाल

टाईट जीन्स घातल्यानं तुमच्या पोटाच्या भागावर चट्टे उठू शकतात आणि त्यामुळे बसताना तुम्हाला श्वास घेताना त्रासही होऊ शकतो किंबहूना श्वास कोंडलाही जाऊ शकतो. अनेकदा जास्त वेळ असंच टाईट जीन्समध्ये जास्त तास बसून राहिल्यानं तुम्हाला हालचाल करणंही शक्य होतं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या पायांवर आणि प्रायव्हेट पार्टवरही होऊ शकतो. त्यामुळे कंबरेसाठी सैल कपडे घालणं आवश्यक होऊन जातं. याचा त्रास इतका होतो कारण टाईट जीन्स घातल्यानं स्नायूंना आणि नसांना (nerves) त्रास होतो. मुंग्या येण्याचे प्रमाणही यात अधिक असते. त्यामुळे संधीवाताचाही प्रोब्लेम तुम्हाला येऊ शकतो. टाईट जीन्समुळे रक्ताभिसरणातही प्रोब्लेम होतो त्याचबरोबर याचा परिणाम मग हृदयावरही होण्याची शक्यता असते. असं म्हणतात की टाईट जीन्स घातल्यानं त्याचा परिणाम तुमच्या प्रजननावरही (reproduction) होतो. 

कशी घ्याल खबरदारी?

  1. तुम्हाला वेगानं चालण्याची सवय असेल तर घट्ट जीन्स घालू नका.
  2. रोज घट्ट जीन्स घालू नका, कधीतरी लुझ पॅन्ट घाला. 
  3. शरीरात काही ऍलर्जी असल्यास घट्ट जीन्सऐवजी सैल जीन्स घाला.