Recipes: साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतं मध, पण वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

How To Substitute Honey For Sugar: साखरेऐवजी मधाचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामुळं पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2024, 06:07 PM IST
Recipes: साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतं मध, पण वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी title=
kitchen tips in marathi How To Substitute Honey For Sugar in recipe

How To Substitute Honey For Sugar: भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गोड खाणं काही भारतीयांकडून सुटत नाही. अतिप्रमाणात साखर खाणे हे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळं हल्ली साखरेला पर्याय म्हणून मध किंवा गुण वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पण पदार्थांमध्ये साखरऐवजी मध वापरल्यानंतर कधीतरी तो पदार्थ बिघडण्याची भिती असते. त्यामुळं जर तुम्ही साखरेऐवजी मध वापरत असाल तर काय काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. 

मधाचे फायदे

सगळ्यात आपण मधाचे फायदे जाणून घेऊया. मध खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे असतात. कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने वजन झटपट कमी होते. तसंच, मधामध्ये अनेक पोषक घटक असतात. मधात ग्लुकोज किंवा फ्रुकटोचे प्रमाण असते. शरीरातील कफ दूर करण्यासाठी मध खूप उपायकारक आहे. मधात नैसर्गिक साखर असते. कफ प्रकृत्ती असलेल्या लोकांसाठी मध खूप फायदेशीर आहे. तसंच, रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठीही मध खूप फायदेशीर आहे. 

साखरेऐवजी मधाचा पर्याय फायदेशीर

पदार्थाचा गोडवा वाढवण्यासाठी साखरेऐवजी मधाचा पर्याय खूप फायदेशीर आहे. पण मध वापरताना खूप काळजीपूर्वक वापरावे लागते. कारण साखरेऐवजी मधाचा वापर करणाऱ्या वर्गाला फायद्याऐवजी जास्त नुकसान होऊ शकते. जर तुम्ही केक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये मध वापरत असाल तर नेहमीच्या साखरेच्या प्रमाणापेक्षा अर्धे प्रमाण मधाचे घ्या. कारण मध साखरेपेक्षा अधिक गोड असते. त्यामुळं तुमचा पदार्थ बिघडू शकतो. 

केक बनवताना साखरेऐवजी मध वापरत असाल तर लक्षात घ्या की साखर हे सॉलिड फॉर्ममध्ये असते तर मध लिक्विड फॉर्ममध्ये. त्यामुळं कोणत्याही पदार्थात मध घालत असल्याने पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात घ्यावे. 

अनेकांना साखर चपाती खाण्याची सवय असते अशावेळी जर तुम्ही चपातीवर मध टाकून खात असाल तर लगेचच ती चपाती खाऊन घ्या. कारण मधामुळं ती चपाती नरम होऊ शकते चपातीला शेद पकडू शकतो. 

मधुमेहाच्या रुग्णांनी मध खावे का?

मधुमेहाच्या रुग्णांनी मात्र मध खाताना काळजी घ्यावी. मधामध्ये कॅलरी, साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. जर मधाची साखर आणि मधासोबत तुलना केल्यास मधाचा साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम होतो. तरीदेखील डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना मधाचा वापर करण्यास परवानगी देतात.