Foods You Should Not Keep In Refrigerator: फ्रीज हा आपल्या घरातील अत्यावश्यक घटक आहे. फ्रीज नसेल तर गृहिणींची मोठी तारांबळ उडते. आठवड्याभराच्या भाज्या आपण बिनधास्त आणून फ्रीजमध्ये ठेवून देतो. तसंच, शिल्लक राहिलेले अन्नही फ्रीजमध्ये ठेवतो. जर फ्रीज नसता तर हे अन्न खराब होते तसंच, भाज्याही फार काळ टिकत नाहीत. खासकरुन गरमीच्या दिवसांत फ्रीजचे खरे महत्त्व कळते. उन्हाळ्याच्या दिवसात पदार्थ थोडे दिवस तरी बाहेर ठेवले तरी ते खराब होतात किंवा त्यांना दुर्गंध येण्यास सुरूवात होते. म्हणून गृहिणी फ्रीजमध्ये सगळंच अन्न ठेवतात.
खराब होण्याच्या भीतीने प्रत्येक पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाहीये. न्यूट्रिशनिस्ट आइना सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार काही खाण्या-पिण्याचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे हानिकारक ठरु शकते. आइनाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये कधीही ठेवू नयेत आणि त्यामागची कारणे काय, जाणून घेऊया.
खडे मसाले- फ्रीजमध्ये खडे मसाले ठेवल्याने त्यांवर मॉइश्चर म्हणजेच दमटपणा येतो. त्यामुळं मसाले खराब होऊ शकतात
ब्रेड- फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने ब्रेड लवकर खराब होऊ शकतात. फ्रीजमध्ये ब्रेड सुकतात आणि लवकर कठोर होतात.
सुका मेवा- सुका मेवा कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये थंड आणि मॉइश्चर सुक्या मेवाचा स्वाद बिघडू शकतो आणि तसंच, सुका मेवा लवकर खराब होऊ शकतो.
मसाले आणि हर्ब्स- फ्रीजमध्ये सतत बदलते तापमान आणि दमटपणा यामुळं मसाले आणि हर्ब्स त्यांचा सुवास आणि फ्लेवर खराब होतो.
केसर- तज्ज्ञांच्या मते, केसर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात दमटपणा येऊ शकतो आणि त्यामुळं केसरच्या गाठी बनू शकतात आणि त्यामुळं त्याचा सुंगध व चव बिघडू शकते.
कॉफी- जर कॉफी फ्रीजमध्ये ठेवली तर कॉफीच्या बरणीत दमटपणामुळं कॉफीचा दगडाप्रमाणे कडक होते. यामुळं कॉफीच्या फ्लेवरमध्येही फरक पडतो.
न्युट्रिशनिस्ट (Nutritionist) च्यानुसार, खाण्या-पिण्याच्या या वस्तु फ्रीजच्या आत ठेवण्याऐवजी बाहेरच्या थंड जागेत ठेवा. यामुळं या वस्तु फ्रेश व फ्लेव्हर दीर्घकाळापर्यंत टिकून राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)