मुंबई : रेफ्रिजरेटरचा वापर प्रामुख्याने अन्न टिकवण्यासाठी केला जातो.
पण ब्युटी प्रोड्क्ट्सदेखील दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी ती इतरत्र ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला ब्युटी एक्सपर्टने दिले आहे.
फेशिएल मास्क - चेहरा तजेलदार करण्यासाठी अनेकदा घरगुती फेशिएल मास्कचा वापर केला जातो. मात्र ते वापरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावेत. त्वचेवरील लालसरपणा आटोक्यात ठेवण्यासाठी थंडगार मास्क अधिक प्रभावी ठरतो.
लिपस्टिक आणि लीप बाम - अनेकांच्या लीपस्टिक आणि लीप बाम बॅगेमध्येच पडून राहिल्याने विरघळल्याचे पाहिले असेल. लिपस्टिक खराब किंवा मेल्ट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावी.
आयलायनर पेन्सिल - पेन्सिल टोकधार बनवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवा. दहा मिनिटांनंतर शार्प करा यामुळे ती अधिक झटपट आणि योग्यप्रकारे होईल.
नॅचरल प्रोडक्ट्स - कॉस्मॅटिकमध्ये तुम्ही कोणत्याही नॅचरल प्रोडक्टचा वापर करत असल्यास ते पहिल्यांदा वापरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्यास ते अधिक उत्तम स्थितीत राहतील तसेच त्यामध्ये बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
परफ्युम - परफ्यूम अधिक काळ टिकण्यासाठी आणि उष्णता तसेच सूर्यप्रकाशामुळे त्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी परफ्यूमदेखील फ्रीजमध्ये ठेवा.