मुंबई : काही लोकांना बॉडी बनवण्याची आवड असते आणि त्यासाठी ते प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्सचा वापर करतात. तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन पावडरचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. या बाबतीत निष्काळजी राहिलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
तुम्ही जर जिममध्ये प्रोटीन पावडरही घेत असाल किंवा त्याबाबत प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्यात. जर तुम्ही या गोष्टींचं पालन केलं तर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जिम दरम्यान, सर्व लोकांना प्रोटीनचं प्रमाण नैसर्गिक पद्धतीने पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. मसल मास राखण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला प्रति किलोग्रॅम वजनासाठी 1 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं. जे लोक त्यांच्या आहारात अंडी, मांस, चीज, मासे, चिकन, दूध, दही आणि फळांचा समावेश करतात, त्यांना गरजेनुसार प्रोटीन मिळते.
ज्या लोकांना नैसर्गिकरित्या प्रोटीन मिळू शकत नाहीत, त्यांना कधीकधी प्रोटीन पावडर वापरण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीन पावडर अत्यंत सावधगिरीने खरेदी करावी. बाजारात उपलब्ध असलेली काही उत्पादनं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
ज्या लोकांना लिव्हरसंदर्भात समस्या आहेत त्यांना प्रोटीन पावडर घेण्याचा सल्ला दिला जात नाही. याशिवाय किडनी आणि इतर अंतर्गत आजार असलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट घेण्यास मनाई आहे.
फिटनेस प्रशिक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे, डॉक्टर कधीही प्रोटीन पावडरचा सल्ला देत नाहीत. जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता.
सर्व लोकांनी जिम करताना सकस आहार घ्यावा. जर तुम्ही त्यासोबत योग्य व्यायाम केलात तर तुम्हाला कोणतेही सप्लिमेंट घेण्याची गरज भासणार नाही. बाजारात उपलब्ध असलेले काही सप्लिमेंट्स आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात, त्यामुळे बॉडी बिल्डिंग अत्यंत सावधगिरीने करायला हवी.