Health Benefits Of Cardamom: आकाराने छोटी असली तरी वेलचीचे अनेक फायदे आहेत. अनेकदा चहामध्ये किंवा मसालेभातात स्वादासाठी व सुवासासाठी वेलचीचा वापर करतात. वेलचीच्या सुवासामुळं पदार्थाची रंगत अजूनच वाढते. अनेकदा मिठाई किंवा गोडाच्या पदार्थांमध्येही वेलची वापरली जाते. वेलचीमध्ये पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium), मॅग्निशियम (Magnesium) आणि अँटीऑक्सिडेंट्स (Antioxidants) आढळतात. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. यालेखात आज आपण वेलचीचे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घेऊयात.
वेलची फक्त चावून खाल्ल्यानेही शरीराला अनेक लाभ मिळतात. वेलची खाल्याने एंजाइम्सचे सिकरिशन स्टिम्यूलेट होतात ज्यामुळं पचन होण्यास मदत होते. तसंच, सूज, गॅस आणि पोटात दुखणेसारख्या समस्या पाचनसंबंधी समस्यांपासून आराम मिळतो.
वेलचीचा वापर नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणूनही करता येऊ शकतो. रोज एक वेलची चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि फ्रेश वाटते.
वेलची नैसर्गिंकरित्या ब्लड थिनर म्हणून काम करते. वेलचीमुळं शरीरातील सर्व नसांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होते. वेलची खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत त्यामुळं हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो.
शरीरात विषारी पदार्थ जमा होण्यास सुरुवात झाली तर अनेक आजारांचा धोका वाढतो. पण वेलची खाल्ल्याने युरिनचा फ्लो वाढतो आणि बॉडी डिटॉक्स होते. वेलची खाल्ल्याने किडनीचे कार्य अधिक सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका दूर होईल.
रोज २ वेलच्या खाऊन त्यावर पाणी प्यायल्यास केस मजबूत होतात. त्यामुळं केस गळतीही थांबते व घनदाट केस होतात.
एकाच जागी बसून काम केल्यामुळं लठ्ठपणा व पोटाचा घेर वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेलची हा चांगला पर्याय आहे. रोज २ वेलची चावून खा आणि त्यावर गरम पाणी प्या. पॉटेशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन B1,B6 आणि व्हिटॅमिन C शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शियममुळं वजन कमी करण्यात मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)