तुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग त्यांच्या आहारात आजच करा 'हे' बदल

 फक्त प्रौढांनाच नव्हे, तर लहान मुलांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसताना दिसत आहे. कारण, दर दिवशी त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही ना काही तक्रारी पाहायला मिळत आहेत. 

Updated: Sep 21, 2022, 03:03 PM IST
तुमची मुलं वारंवार आजारी पडतात? मग त्यांच्या आहारात आजच करा 'हे' बदल title=
immunity booster food For Small Kids

Health News : कोरोना (Corona) व्हायरसचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही, सध्याच्या दिवसांमध्ये प्रकृतीमध्ये होणारे चढऊतार बऱ्याच अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. फक्त प्रौढांनाच नव्हे, तर लहान मुलांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसताना दिसत आहे. कारण, दर दिवशी त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही ना काही तक्रारी पाहायला मिळत आहेत. आमच्या बाळाला तापच येतो... आमच्या चिंगीचा खोकलाच जात नाही असे सूर पालकवर्ग आळवत असतो. पण, नेमकं असं का होतं? 

आपण कुठे कमी पडतोय का? याचा विचार केला जाणं महत्त्वाचं आहे. तुमचंही मूल जर सतत आजारी असेल, तर तुम्हीही सर्वप्रथम त्याच्या आहाराच्या सवयींमध्ये काही गोष्टी बदलणं गरजेचं आहे. आहारामध्ये (Diet) काही महत्त्वाच्या घटकांचा समावेश केल्यास मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास त्याचा मदत होतो हे विसरून चालणार नाही. 

दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products)
(Milk, Cheese, paneer, Curd) दूध, दही, पनीर, चीज या पदार्थांमध्ये असे बॅक्टेरिया असतात ज्यामुळं पचनक्रिया सुरळीत सुरु राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एक लक्षात घ्या, की दही कायमच सकाळच्या वेळेत सेवन केलं जाईल याची काळजी घ्या. 

आंबट पदार्थ (Citric Food)
आंबट पदार्थांमध्ये Vitamin C चं प्रमाण सर्वाधिक असतं. हा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदतीचा ठरतो. त्यामुळं मुलांना (Lime, grapes, amla) द्राक्ष, लिंबू, पेरू, आवळा, बेरी अशी फळं नक्की खायला द्या. 

हिरव्या भाज्या (Green Vegetables)
हिरव्या आणि विशेष म्हणजे पालेभाज्या असंख्य पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. यामध्ये लोह आणि व्हिटामीन सी, के असे घटक असतात. (Palak, Methi) मेथी, पालक, केल अशा भाज्यांचा आहारात समावेश केल्यास लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचं कवच निर्माण करण्यात याची मदत होते. 

सुकामेवा (Dry Fruits)
सुकामेवा लहान मुलांनाही आवडतो. यामध्ये झिंक, लोह, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असे घटक असतात. काही मुलांना जर सुकामेवा आवडत नसेल, तर त्यामध्ये काही सीड्स, मध आणि कोको पावडर वापरून तुम्ही त्याचा एनर्जी बार तयार करु शकता. मुलं त्याला कधीच नकार देणार नाहीत. 

नारळ पाणी (Coconut Water)
नारळपाणी अमृताहून कमी नाही, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. लहानांसोबतच मोठ्यांसाठीही नारळपाणी फायद्याचं ठरतं.