मुंबई : मांजरींशी खेळायला अनेकांना आवडतं. मात्र बरेचदा खेळताना मांजरींचे दात लागतात किंवा नखं लागतात. मांजरीचे दात किंवा नखं लागल्यास तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. मांजर चावल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जावं. मांजरीची नखं लागल्याने किंवा चावल्याने बॅक्टेरिया तुमच्या शरीरात पसरू शकतो. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत मांजर चावल्यानंतर पहिल्यांदा काय करावं?
जर मांजरीला रेबीज झाला असेल तर त्याच्या चाव्याव्दारे तुम्हाला रेबीज होऊ शकतो. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेबीजचं इंजेक्शन किंवा लस घेणं. याशिवाय, मांजर चावल्यास तुम्हाला टिटॅनसचं इंजेक्शन देखील घ्यावं लागेल.