NO SMOKING DAY : धूम्रपान कायमचं सोडायचं आहे , पण सुटत नाही ? या पाच टिप्स करतील खूप मदत

No Smoking Day 2023: धूम्रपान करणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे  कॅन्सरचं प्रमाण आणखी वाढतं. शिवाय हार्ट अटॅक येण्याची शक्यता आणखी बळावते. यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 8 मार्च ला नो स्मोकिंग डे साजरा केला जातो.

Updated: Mar 8, 2023, 02:27 PM IST
NO SMOKING DAY : धूम्रपान कायमचं सोडायचं आहे , पण सुटत नाही ? या पाच टिप्स करतील खूप मदत title=

Home Remedies to Quit Smoking : देशभरात ८ मार्चला नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. स्मोकिंग केल्याने हार्ट अटॅक (heart attack) आणि कॅन्सरसारख्या (cancer) भयंकर आजारांशी झुंज द्यावी लागते, धूम्रपान करणं आरोग्याला खूप हानिकारक (smoking is injurious to health) आहे हे आपण सारेच जाणतो पण , सवयीला औषध नाही असं म्हणतात ना त्याचप्रमाणे काहींची गत होते. स्मोकिंग करणं वाईट आहे ते सोडायची इच्छा असते पण आपण त्याच्या इतके आहारी गेलेलो असतो कि,  ठरवूनही स्मोकिंग सुटत नाही. अशांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे.  (​How to quit smokingthe most effective tips to stop smoking no smoking day )

कॅन्सर आणि हार्ट अटॅक इतकचं नाही तर इतरही गंभीर आजार आपल्याला स्मोकिंग केल्याने जडू शकतात. आज नो स्मोकिंग डे (No Smoking Day 2023) आहे. आणि आजचा हा दिवस, स्मोकिंग कायमच सोडून साजरा केला तर ? आणि त्यासाठी काही बेस्ट टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत , त्या वापरून तुम्ही स्मोकिंग नक्कीच बंद करू शकता.

मध आणि लिंबाचा रस 

स्मोकिंग ची सवय सोडण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. मधामध्ये प्रोटीन, एंझाइम, इतर व्हिटॅमिन्सची मात्रा भरपूर प्रमाणात असते.  रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून त्याच सेवन करावे. 

दालचिनी 

स्मोकिंग सोडवायचं असेल आर रोज दालचिनीचा तुकडा सोबत ठेवा आणि तल्लप आली कि थोढीशी दालचिनी चघळा. 

तांब्याचा भांड्यातल पाणी

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शरीरातून टॉक्सिक बाहेर काढण्याचं काम करतं. स्मोकिंग ची तालप कमी करण्यासाठी खूप फायदेशी५र आहे 

त्रिफला पावडर 

स्मोकिंग ची तलप  सोडवण्यासाठी  त्रिफळा पावडर च सेवन करायला हवं. यासाठी रोज रात्री झोपण्याआधी त्रिफळा चूर्ण खावे. 

तुळशीची पानं

आपण सारेच जाणतो, तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. स्मोकिंग सोडवण्यासाठी अत्यंत गुणकारी म्हणून तुळशीची पानं रोज सकाळी उपाशी पोटी खावीत.  

व्यायाम 

स्मोकिंग करण्यासाठी काही खास व्यायाम आहेत ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये जमा झालेलं निकोटीन कमी व्हायला मदत होते. प्राणायाम , कपालभाती सारखे योग प्रकार मदत करतील.  (How to quit smoking the most effective tips to stop smoking no smoking day)