उन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'

  गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला  अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार  आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी  व तृष्णाशामक  गुलकंदच घ्या.

Updated: Mar 28, 2018, 09:36 PM IST
उन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'  title=

मुंंबई :  गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला  अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार  आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी  व तृष्णाशामक  गुलकंदच घ्या.

   कसे आहे ‘गुलकंद’ आरोग्यासाठी  हितकारी  – 

उष्णतेपासून सुटका  होते –

साखर व गुलाबाच्या पाकळ्यापासून तयार होणारा गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करण्याचे  काम करतो. वाढत्या उकाड्यामुळे शरीरात होणारा दाह कमी होतो. उकाड्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ‘डि-हायड्रेशन’चा त्रास होण्याची शक्यता  असते. त्यापासून तुमचा बचाव  होतो.  तसेच शरीरात वाढणार्‍या उष्णतेमुळे पित्त , जळ्जळ यासारख्या समस्यांपासुन आराम मिळतो.

अ‍ॅन्टीऑक्सिडंटनी परिपुर्ण –

गुलकंदामुळे शरीराला अ‍ॅन्टीऑक्सिडंट्सचा  पुरवठा होतो.यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व  थकवा (अशक्तपणा) दूर होतो.

त्वचा आरोग्यदायी बनवते-

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब’ फारच हितकारी आहे. गुलाबाचा मंद सुगंध व अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे  अनेक फेसपॅक्समध्ये , आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचा वापर केला जातो. गुलकंद खाल्ल्याने त्वचेचा पोत आतुन सुधारण्यास मदत होते.

व्हिटमिन्सचा पुरवठा –

गुलकंदात गुलाबाबरोबरच , साखरही असल्याने शरीराला व्हिटामिन सी व व्हिटामिन ई चा पुरवठा होतो.

पचनक्रिया सुधारते –

जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन  उत्तम होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात उद्भवणारे पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते. गुलकंद हे उन्हाळ्यात उर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे.

घरच्या घरी कसा  बनवाल ‘ गुलकंद’ –  

गुलकंद बनवण्यासाठी गावठी जातीचे गुलाब  वापरावे.
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेली गुलाब वापरू नयेत.

गुलकंदासाठी गुलाबाच्या पाकळ्या व साखर समप्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर घालून घ्यावा.

 मिश्रणाचे पातेले झाकुन , आठवडाभर  दिवसा सुर्यप्रकाशात तर नंतर सावलीत  ठेवावे  व  दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.
सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात विघटित होतात व गुलकंदाला लाल रंग येतो.

मग तयार झालेला गुलकंदाचे तुम्ही नियमित सेवन करू शकता. मात्र गुलकंदात साखरेचे प्रमाण  अधिक असल्याने, मधुमेहींनी गुलकंद  खाणे टाळावे  असा  सल्ला ज्येष्ठ आहारतज्ञ वसुमती धुरू  देतात.