मुंबई : अनेकदा ऑफिसमध्ये सलग 7-8 तास बसावं लागतं. अशावेळेस तुम्ही कायम शूज घालून बसू शकतं नाही. अनेकदा चप्पल असेल तर तुम्ही ती सहज काढून बसू शकता पण जर तुम्ही कायम शूज घाअत असाल तर अनेकदा ते काढून बसल्यावर पायांना येणार्या दुर्गंधीमुळे तुम्हांला चार चौघांत खजील झाल्यासारखे वाटते. चार चौघांत पायाला येणार्या घामाच्या दुर्गेंधीचा त्रास टाळायचा असेल तर काही घरगुती उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
शूजामुळे येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी टी बॅग उकळत्या पाण्यात ठेवा. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढा. हे थंड होऊ द्या. शूजमधील दुर्गंधी टाळण्यासाठी त्यामध्ये टी बॅग्स ठेवा. या उपायामुळे शूजामधील दुर्गंध दूर होण्यास मदत होईल.
शूजमधील दुर्गंधी टाळण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. शूजमध्ये बेकिंग सोडा शिंपडा. हा उपाय तुम्ही रात्री करू शकता. रात्री बेकिंग सोडा शूजमध्ये टाका आणि सकाळी ते साफ करा. यामुळे झटपट शूजमधून येणारी दुर्गंधी कमी होते. सोबतच शूजामधील बॅक्टेरियादेखील कमी होतात.
शूजमध्ये सायट्र्स फळांच्या साली टाकल्यानेही दुर्गंधी कमी होते. सोबतच दिवसभर शूजामधून येणारा वास कमी होतो. प्रत्येकवेळेस तुमच्याजवळ फळ नसेल तर लवेंडर तेलाचाही तुम्ही वापर करू शकता. यामधील अॅन्टी बॅक्टेरियल क्षमता शूजामधील दुर्गंध कमी करतो.
पावसाळ्याच्या दिवसात किंवा शूज भिजल्यावर ते वेळीच सुकवणं गरजेचे आहे. याकरिता तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पंख्याखालीदेखील शूज मोकळे करून ठेवल्यास ते सुकतात.
शूजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी नियमित सॉक्स बदलणं गरजेचे आहे. पायाला दुर्गंधी येत असल्यास त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढतात. बॅक्टेरियाला दूर ठेवा. सोबतच नियमित स्वच्छ केलेले सॉक्स घालावेत.