मोबाईलमुळे हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव वाढतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mobile linked high blood pressure : मोबाईलचा वापर केल्यास हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव यांच्यामध्ये वाढ होते, असा नुकताच एक दावा करण्यात आला आहे.

Updated: May 9, 2023, 10:11 PM IST
मोबाईलमुळे हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव वाढतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? title=

Mobile linked high blood pressure : नुकतंच असा दावा करण्यात आला आहे की, तुमच्या मोबाईलमुळे तुम्ही आजारी पडू शकता. आठवड्यात 4 ते 5 तास मोबाईलचा वापर केल्यास हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव यांच्यामध्ये वाढ होते. 

दरम्यान हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. मोबाईल ही सगळ्यांची गरज झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सगळेच जण मोबाईल वापरतात. त्यामुळे या दाव्यात किती तथ्य आहे ...? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुया.

काय आहे हा व्हायरल मेसेज?

आठवड्याला 4 ते 5 तास मोबाईलचा वापर केल्याने हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव वाढू शकतो. मोबाईलचा वापर करणा-यांना मोबाईल वापर नसलेल्यांच्या तुलनेत हाय ब्लडप्रेशरची जोखीम 7 टक्क्यांनी वाढते. आठवड्यात मोबाईल संभाषण अर्ध्या तासाहून कमी केल्यास धोका कमी होतो.

72 टक्के स्मार्टफोन युजर कमी बॅटरीमुळे अँक्झायटीचे शिकार आहेत. 20 टक्क्यांपेक्षा कमी बॅटरीला पाहून अँक्झायटीचा त्रास होऊ लागतो. बॅटरी लो झाल्याने बेचैन होतात. काही लोक रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरतात. या दाव्याची पडताळणी केली.

पडताळणीतून समोर आलेलं सत्य?

  • मोबाईलचा अतिवापर केल्यास हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो
  • मानसिक तणाव, अँक्झायटीचा त्रास सुरू होतो
  • मोबाईलची बॅटरी लो झाली तर अनेकजण बैचेन होतात
  • काहींना मोबाईलच्या रिंगटोनचा भास होतो

त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळा. मोबाईलचा वापर जेवढा चांगला तितकाच आरोग्यास घातक आहे.आमच्या पडताळणीत मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा सत्य ठरला.