उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? शरीरात काय बदल होतात?, वाचा

Hot Water Side Effects In Summer: वजन कमी करण्यासाठी अनेकजण गरम पाणी पितात. मात्र, उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? जाणून घ्या .  

मानसी क्षीरसागर | Updated: May 21, 2024, 05:42 PM IST
 उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? शरीरात काय बदल होतात?, वाचा title=
Here Are Side Effects Of Drinking hot water in summer

Hot Water Side Effects In Summer: वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेस फ्रीक त्यांच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिण्याने करतात. एक कप गरम पाणी प्यायल्याने शरीरातल विषारी घटक बाहेर फेकले जातात. त्याचबरोबर बॉडी डिटॉक्ससाठीदेखील हे चांगले मानले जाते. काही जण संपूर्ण दिवसभरही गरम पाणी पित असतात. पण यंदा उन्हाने कहर केला आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळं घामाच्या धारा लागल्या आहेत. अशावेळी गरम पाणी प्यावे का? असा सवाल उपस्थित होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप जास्त गरम पाणी पिणे लाभदायक की नुकसानदायक ठरते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या. 

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी गरम पाण्याचे फायदे जाणून घेऊया. गरम पाणी पचनसंस्था निरोगी ठेवते आणि अॅक्टिव्ह ठेवते. थंड पाण्याच्या तुलनेने गरम पाणी जेवण लवकर पचण्यास मदत करते. तसंच, बद्धकोष्ठतेचा धोकादेखील कमी करते. 

गरम पाणी प्यायल्याने शरीरातील तापमान वाढते आणि घाम येण्यास सुरुवात होते. त्यामुळं शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत होते. 

सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. गरम पाणी शरीरातील मेटाबॉलिज्ममध्ये सुधार करते. त्यामुळं वजन कमी करण्यास मदत मिळते. 

सायनसच्या समस्येवर आराम मिळावा म्हणून गरम पाणी फायदेशीर ठरु शकते. गरम पाणी प्यायल्यामुळं सर्दी बाहेर पडण्यास मदत होते. 

 उन्हाळ्यात उकळते पाणी प्यावे का?

उन्हाळ्यात कोमट पाणी प्यावे जास्त उकळते पाणी प्यायल्यास त्याचा उलटाच परिणाम होऊ शकतो. गरम पाणी रक्तप्रवाह सुरळीत करतो. त्यामुळं मांसपेशियात वेदना आणि सांधेदुखीपासून दिलासा मिळतो. मात्र, खूप जास्त गरम पाणी प्यायल्यामुळं त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो यामुळं तुमच्या सांध्यामध्ये सूज येऊ शकते.  उन्हाळ्यात शरीराचे तापमान जास्त असते. त्यामुळं जास्त प्रमाणात गरम पाणी पिऊ नका. 

उन्हाळ्यात उकळते किंवा कडकडीत पाणी पिता तेव्हा तुम्हाला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पोट दुखणे, तोंड येणे, अपचन अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी जास्त गरम पाणी न पिता थोटे कोमट पाणी प्यावे.   

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)