रात्रीच्या जेवणानंतर केलेल्या 'या' चुकांमुळं वाढतो लठ्ठपणा; आत्ताच सावध व्हा अन्यथा वाढेल धोका

Health Tips For Weight Loss: लठ्ठपणा ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम किंवा डाएट केले जाते. मात्र तुमच्या काही सवयी बदलूनही तुम्ही लठ्ठपणा कमी करु शकता. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 10, 2023, 12:03 PM IST
रात्रीच्या जेवणानंतर केलेल्या 'या' चुकांमुळं वाढतो लठ्ठपणा; आत्ताच सावध व्हा अन्यथा वाढेल धोका title=
Health Tips in marathi these mistakes made after dinner can increase your weight

Health Tips For Weight Loss: खराब लाइफस्टाईल आणि वेळी अवेळी जेवणे यामुळं वजन वाढण्याची समस्या तीव्र होत चालली आहे. वजन वाढल्यामुळं अनेक आजारांचाही सामना करावा लागतो. मधुमेह, उच्च रक्तदाबसारख्या कारणांमुळंही लठ्ठपणा वाढतो. तर, अनेकदा जेवल्यानंतर केलेल्या काही चुकांमुळंदेखील लठ्ठपणा वाढत जातो. रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय घातक ठरते. त्यामुळं पाचनसंस्था बिघडते आणि लठ्ठपणा वाढत जातो. त्यामुळं रात्री जेवल्यानंतरच्या या चुका टाळल्यास लठ्ठपणा नियंत्रित राहिल. (Health Tips For Weight Loss In Marathi)

रात्री जास्त पाणी पिऊ नका

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. मात्र, जेवण जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्याचा विचारही करु नका. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेवण केल्यानंतर ते पचण्यासाठी कमीत कमी दोन तासांचा वेळ लागतो. त्यात तुम्ही जर मध्येच पाणी पिता तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. म्हणूनच जेवल्यानंतर कमीत कमी 45 ते 60 मिनिटांनंतर पाणी प्यावे. तसंच, जेवायच्या आधी पाणी प्यायचे झाल्यास अर्धा तास आधी पाणी प्या. 

जेवल्यानंतर लगेचच झोपणे

जेवल्यानंतर लगेचच झोपल्यास जेवण पचत नाही यामुळं वजन वाढणे, अॅसिड रिफ्लक्स आणि पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. छातीत जळजळ होणे, गॅस अॅसिडिटी, ब्लॉटिंग सारख्या समस्या होतात. जेवण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेत कमीत कमी 3-4 तासांचा गॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळं अशापद्धतीनेच तुमचा डिनर प्लान करा. 

कॅफीनचे सेवन

काही जणांना चहा आणि कॉफी पिण्याची जास्त सवय असते. थकवा घालवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळाला चहा किंवा कॉफी घेतात. काही जण तर जेवल्यानंतरही लगेचच चहा किंवा कॉफी घेतात. मात्र, यात कॅफीनचे जास्त प्रमाण असते. तज्ज्ञांच्या मते, कॅफीनचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास पाचनसंस्था कमजोर होते. शरीर जेवण डायजेस्ट करु शकत नाही. त्यामुळं गॅस-अॅसिडिटीसाख्या समस्या निर्माण होतात. तसंच, वजनही वाढते. 

रात्री उशीरा जेवणे

रात्रीचे जेवण खूप उशीरा करणे. लोकांना दिवसभरातील कामे पूर्ण करण्यास उशीर होतो. अशावेळी रात्रीचे जेवण करण्यास उशीर होतो.अशावेळी लोक जेवण करुन लगेचच झोपतात. ही खूप मोठी चूक ठरु शकते त्यामुळं तुमचं वजन वाढू शकते. तुम्हाला रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2-3 तासांच्या आधी करावे. जेणेकरुन पचनसंस्थेला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळं तुम्हाला रात्री 7-8 वाजता जेवणे गरजेचे आहे. आणि 10-11 वाजता झोपावे. 

रात्रीच्या जेवणानंतर या गोष्टींची काळजी घ्या 

- कामाच्या गडबडीत जर तुम्हाला रात्री लवकर जेवायला जमत नसेल तर तुम्ही असे जेवणात असे पदार्थ घ्या जे आरामात पचू शकतात. तुम्ही रात्रीच्या जेवणात फायबरची मात्रा अधिक असलेले जेवण खावे. जेवणात तुम्ही भाज्या आणि सलाड सामील करु शकतात. 

रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करा. लगेचच झोपणे आरोग्यासाठी हानिकार ठरु शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)