Dizziness Reasons in Marathi: आजची लाइफस्टाइल आणि धकाधकीच्या आयुष्यात अनेक आजारांचा सामना करावा लागतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र अशक्तपणा आहे असं समजून आपण दुर्लक्ष करतो. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण ही लक्षण भयानक आजारांची शक्यता वर्तवतात. त्यामुळं चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
गरगरणे, चक्कर येणे ही अशक्तपणाची लक्षणे असू शकतात. पण झोपेतून उठल्याबरोबरच अचानक चक्कर येणे यामागे 7 गंभीर आजारांचा धोका असू शकतो. हे आजार घातक ठरु शकतात. त्यामुळं ही लक्षणे हलक्यात न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोपताना जास्तकरुन रक्ताचा प्रवाह हा पोटाच्या दिशेने असतो. त्यामुळं अचानक उभं राहिल्यानंतर रक्तप्रवास डोक्यापासून पायापर्यंत जातो. ही क्रिया अगदी जलद घडते. त्यामुळं तुमचं डोक गरगरायला लागते किंवा चक्कर येते. म्हणजेच अचानक झोपेतून उठल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होणं असं आहे. याला ऑर्थोस्टेटिक या पोस्चुरल हायपोटेंशन असं म्हणतात.
अंधुक दिसायला लागते
धातीत किंवा खांद्यात वेदना जाणवणे
मन एकाग्र होत नाही
थकवा किंवा अशक्तपणा
डोकेदुखी
हृदयाचे ठोके असमान्य असणे
मळमळणे
गरम होणे किंवा घाम अति प्रमाणात येणे
श्वास फुलणे
१ व्हिटॅमिन बी 12ची कमतरता किंना अॅनिमिया असल्यास अचानक डोके गरगरते
२ डायरिया, उलटी यामुळं शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होणे
३ डायबेटीज, थायरॉइडसारखी एंडोक्राइन सारख्या आजारांचा धोका
४ हृद्याचे ठोके असामान्य होणे
५ उच्च रक्तदाब, डिप्रेशन यांच्या औषधांचा साइट इफेक्ट
६ पार्किसन या डिमेंशिया सारखे आजार
७ गरोदरपणात जाणवणारी अस्वस्थता
जर उभे राहिल्यानंतर तुम्हाला गरगरल्यासारखे वाटतं असेल तर लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क करा व त्यांचा सल्ला घ्या. त्यामुळं तुमच्या आजारांवर वेळीच योग्य उपचार सुरू होतील. या कामात थोडाही हलगर्जीपणा करु नका.
डिहायड्रेशन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि ओओरएस यांचे मिश्रण करुन पाणी प्या. तसंत, अॅनिमियाचा आजार असल्यास व्हिटॅमिन बी 12, लोहयुक्त आहार घ्या दूध, अंड, टेम्पेह, मासे, मांस असे पदार्थ आहारात समाविष्ट करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)