खोकल्याने हैराण आहात का? मग 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

बदलणाऱ्या हवामानामध्ये सर्दी-खोकल्याचा आजार होणे सर्वसाधारण गोष्ट आहे. या काळात कोरड्या खोकल्याची समस्या वाढू शकतात.  

Updated: Nov 1, 2022, 03:14 PM IST
खोकल्याने हैराण आहात का? मग 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका title=

Health News :  बदलत्या काळात खोकला येणे ही साधारण समस्या बनली आहे. परंतु तुमचा खोकला महिना झाला तरी बरा होत नसेल तर समजून जा की तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यात काही गडबड करत आहात. जेव्हा ऋतुंमध्ये चढ-उतार होताना दिसत असेल तर समजून जा की तुमच्यावर खोकल्याचे आक्रमण होणार आहे.

यामध्ये घसा खवखवणे, आवाज बसणे, श्वास लागणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बदलत्या ऋतुंमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे छातीत कफ होण्याची समस्या होऊ शकते. सहसा खोकला एका आठवड्यापर्यंत ठीक होऊ शकतो. परंतु जर तुम्हाला अनेक आठवडे खोकला असेल तर तुम्हाला सावध व्हायची गरज आहे. कदाचित तुम्ही कोरोनिक कफचे शिकार झाले असाल. खोकल्याचा असा एक प्रकार आहे जो महिन्यापेक्षाही जास्त काळ टिकून राहतो. 

'या' गोष्टींचे करु नका सेवन 

खोकल्यातचे मुख्य कारण संसर्ग आहे. त्यासाठी आपण औषधे सुद्धा खातो, परंतु आपण काही गोष्टींची काळजी घेत नाही व आपण काहीही खायला-प्यायला लागतो. जेव्हा तुमच्या घशात कफ वाढला असेल तेव्हा आपल्याला अनेक अन्नपदार्थ टाळले पाहिजेत. 

. दही : दही हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे, दही खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते, आणि बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या होत नाही, पण खोकला झाल्यावर दही खाल्याने कफ वाढू शकतो. कारण दह्याची चव थंड असते. 

२. आईसक्रीम : आईसक्रीमची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते, काही लोक तर खोकला असतानाही आईसक्रीम खाण्याची सवय सोडू शकत नाहीत, त्यामुळेच खोकल्यापासून बराच वेळ आपल्याला आराम मिळत नाही.

वाचा : केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण 

३. थंड पेय : शहरापासून ते गावापर्यंत थंड पेय पिण्याचा एक ट्रेंड बनला आहे, पण जेव्हा तुमचा खोकला बराच काळ गेला तरी बरा होत नसेल आणि तरीही तुम्ही थंड पेय घेत असाल, तर कुठेतरी तुमचे नुकसान होत आहे. 

४. तळलेले पदार्थ : तळलेले पदार्थ खोकल्याच्या स्थितीला अजूनच बिघडवतात. लोणी, चरबी आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिड्स शरीरामध्ये अधिक कफ तयार करण्यास भाग पाडतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तेच अन्न खा.