Medical Bill: कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आणि इंश्युरन्स नाही! अशी कराल पैशांची तजवीज

Medical Bill Reimbursement: वैद्यकीय आणीबाणीत आरोग्य विमा आणि बिले भरण्यासाठी पुरेशी बचत नसेल, तर समस्या खूप वाढू शकतात. अशा स्थितीतही तुम्ही पैसे उभे करू शकता. कसं ते जाणून घ्या

Updated: Nov 22, 2022, 02:02 PM IST
Medical Bill: कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आणि इंश्युरन्स नाही! अशी कराल पैशांची तजवीज title=

Medical Loan: प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. काही सुखाचे, तर काही दु:खाचे क्षण असतात. या सर्वांवर मात करून आपण पुढे जात असतो. पण कुटुंबावर मेडिकल इमरजन्सी ओढावली, तर आपण खचून जातो. कारण कुटुंबातील व्यक्ती बरी व्हावी यासाठी आपण खर्च करण्यास मागे पुढे पाहात नाही. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करतो. व्यक्ती बरी झाली की आपल्या जीव भांड्यात पडतो. पण डिस्चार्ज देण्याची वेळ येते तेव्हा मात्र बिलाचं टेन्शन येतं. जर हेल्थ इंश्युरन्स (Health Insurance) नसेल तर बचत केलेली रक्कम खर्च होते. त्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कधी कधी तर बिल भरण्याासाठी हातात काहीच रक्कम नसते, अशा वेळी पैसे कसे उभे करावे असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला अशा संकटकाळात पैसे कसे उभे याबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात

मेडिकल खर्च 

वैद्यकीय आणीबाणी काही सांगून येत नाही.  पर्यावरण आणि शहरी जीवनशैली तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे अचानकपणे आजाराचं निदान झाल्यास पायाखालची जमिन सरकते. कारण इतका खर्च करणं परवडणारं नसतं. नातेवाईकही अशा संकटाच्या काळात हात वर करतात. त्यामुळे रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी मेडिकल लोन घेण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.  बँकेकडून मेडिकल लोन घेण्याची प्रक्रिया सोपी आहे. बँक आपल्या ग्राहकांना लगेचच लोन देते. 

बातमी वाचा- लग्नासाठी हातात पैसे नाहीत! No Worry, असा कराल पैशांचा जुगाड

मेडिकल लोन

मेडिकल लोन पर्सनल लोनसारखं काम करतं आणि जवळपास पर्सनल लोनसारखंच असतं. वैद्यकीय आणीबाणीत मेडिकल लोन घेण्याचा निर्णय योग्य ठरतो. या माध्यमातून वैद्यकीय बिल, मेडिकल प्रिस्क्रिप्शन बिल, सर्जरी इत्यादींचा खर्च उचलू शकता. मात्र अशी स्थिती ओढवण्यापूर्वीच वैद्यकीय गरज भागवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स असणं आवश्यक आहे.