महिलांसाठी वरदान आहे शतावरी; 'या' पद्धतीने सेवन केल्यास मिळेल फायदा

Shatavari Powder: शतावरी या औषधी वनस्पतींचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहेत. शतावरीच्या सेवनाने अनेक गंभीर समस्यांवर मात देता येईल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 22, 2023, 07:27 PM IST
महिलांसाठी वरदान आहे शतावरी; 'या' पद्धतीने सेवन केल्यास मिळेल फायदा title=
health benefits of shatavari powder for women in marathi

Shatavari Powder Benefits: लठ्ठपणा ही समस्या हल्ली अनेकांमध्ये दिसून येते. बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी जेवण करणे, झोप कमी घेणे यासारख्या सवयींचा शरीरावर नकळत परिणाम होतो. त्यामुळं आनेक आजार जडतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइडप्रमाणेच लठ्ठपणामुळं अनेक जण ग्रस्त आहेत. वजन वाढण्याबरोबरच शरीरातील काही भागांत चरबीदेखील वाढते. यामुळं अनेक आजारांना निमंत्रण मिळते. वाढता लठ्ठपणामुळं हृदयासंबंधित विकारांचा धोका वाढतो. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवले नाही तर एकापेक्षा एक अशा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागेल. अशावेळी लठ्ठपणा कसा कमी करता येईल. यासाठी काय करावे लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Shatavari Health Benefits)

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एकूण 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. लठ्ठपणा कमी कसा करावा, यासाठी तुम्ही आयुर्वेदाचाही आधार घेऊ शकता. आयुर्वेदात असलेल्या औषधी वनस्पतीमुळं तुम्ही लठ्ठपणावर मात करु शकता. शतावरी या वनस्पतींने तुम्ही आरामात वजन घटवू शकता. थंड प्रकृती असलेल्या ही जटीबुटी पित्त कमी करण्यासही मदत करते. फक्त एक महिना रेगुलर सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

शतावरीमध्ये अँटी ऑक्सिडेंट गुण असतात. त्यामुळं हृदय, किडनी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. शतावरीचे सेवन केल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकता. शतावरीमध्ये सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर आढळतात. जे मदत कमी करण्यास फायद्याचे ठरतात. या औषधी वनस्पतीचे सेवन केल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि वजन घटते. 

खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिल्यास, दररोज व्यायाम केल्यास त्याचबरोबर या औषधी वनस्पतीचे सेवन केल्यास तुम्ही जलद गतीने वजन कमी करु शकता. शतावरीचे सेवन केल्यास पोटावरील चरबीप्रणाणेच मांडी, दंड, पाठीवरील चरबी कमी होण्यास मदत होते. 

शतावरीमध्ये पोषक तत्वे आहेत. यात प्रोटीन, आयरन, फायबर आणि सोडियम असते. जे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढते आणि शरीरातील हार्मोन्स कंट्रोल करते. त्यामुळं महिलांनी या औषधी वनस्पतीचे सेवन अवश्य केले पाहिजे. शतावरीचे सेवन केल्यास मासिक पाळीतील दुखणेही कमी होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. 

शतावरीचे सेवन कसे करावे?

शतावरीचे सेवन करायचे झाल्यास, त्याची पावडर पाण्यात मिसळून पिऊ शकता. किंवा रात्री दूधात एक चमचा पावडर टाकूनही घेऊ शकता. शतावरीची चव थोडी कडवट असू शकते मात्र दूधासोबत घेत असताना तुम्ही त्यात थोडे मध टाकूनही पिऊ शकता.