मुंबई : आल्याचा चहा अगदी सर्वांनाच प्रिय असतो. स्वयंपाकातही आपण स्वाद वाढवण्यासाठी आले वापरतो. मात्र आल्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित नाहीत. तर जाणून घेऊया आल्याचे फायदे....
एका संसोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मुलींना मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. अनेक मुली त्रास कमी करण्यासाठी औषधं घेतात. पण त्यावर आलं देखील तितकेच गुणकारी ठरेल. विशेष म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
कच्चे आले चावून खाल्याने दातांचे दुखणे लगेचच कमी होते. त्यात अंटी बॅक्टीरीयल गुणधर्म असतात. आले चावल्याने ते सलायव्हात मिसळते आणि परिणाम घडवते. त्यामुळे दातांचे दुखणे आणि सुज दोन्ही कमी होते.
फॅट्स बर्निंगसाठी आले लाभदायी आहे. आल्यामुळे मेटाबॉलिझम जलद होते. त्यामुळे फॅट्स बर्न होतात. परिणामी पचन सुधारते आणि शरीर सुडौल राहण्यास मदत होते.
शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास आल्यामुळे मदत होते. आलं नियमित खाल्यास हलक्या स्वरूपात घाम येऊन टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात.
आल्यात झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम असते. या सगळ्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य देखील राखले जाते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे विकार होण्याचा धोका अधिक असतो. आल्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो, हे सिद्ध झाले आहे. आल्याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहील.
आल्यात व्हिटॉमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. आल्याचा थोडासा तुकडाही सर्दी-तापावर गुणकारी ठरतो. सर्दी-तापावर आल्याच्या थोडासा तुकडा पाण्यात उकळवून ते पाणी प्या. त्यामुळे घसा दुखणे, खवखवणेही कमी होते.