मुंबई : गोडाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्क्तातील साखरेचे प्रमाण वाढते, वजन वाढते, अनेक आजारांना आमंत्रण देते. असे सल्ले तुम्ही नक्कीच ऐकले असतील.
'अति तेथे माती' या नियमानुसार गोडाचे अतिसेवन त्रासदायक ठरते हे अगदीच बरोबर आहे. परंतू काही वेळेस गोडाच्या पदार्थांचे सेवन आरोग्याला फायदेशीरही ठरते हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
तुमचा मूड डाऊन असेल तर आवडीच्या गोडाच्या पदार्थाचे सेवन नक्की करा. कारण यामुळे तुमचा मूड सुधारायला नक्कीच मदत होऊ शकते. गोडाच्या पदार्थातील कार्बोहायड्रेट्स घटक मेंदू आणि शरीरातील केमिकल घटकाला चालना देतात. याचा परिणाम तुमच्या मानसिक भावनांवरही होतो. त्यामुळे प्रमाणात आणि मनात कोणताच न्यूनगंड न ठेवता गोडाचं सेवन नक्की करा.
वजन वाढू नये म्हणून अनेकजण गोडाच्या पदार्थांपासून दूर राहतात. परंतू यामुळे लहानशा काळासाठी तुम्ही 'वेट लॉस'चं मिशन ठेवू शकतात. पण काही अभ्यासाच्या अनुसाराने विचार केल्यास अनेकदा क्वचित गोडाचे पदार्थ आणि साथीला पुरक आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास वजन घटवण्याचा प्लॅन यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते.
पम्प्किंग पाय ( भोपळ्याचे गोडाचे पदार्थ) , स्ट्रॉबेरी किंवा चेरी यामध्ये नैसर्गिकरित्या aphrodisiacs घटक अधिक असतात.
चॉकलेट केकचा लहानसा तुकडा देखील ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करू शकतो कारण डार्क चॉकलेट मध्ये असनारे फ्लॅवोनल्स, कोको बटरमधून निघणारे नायाट्रिक अॅसिड आरोग्याला पोषक टह्रते. नायाट्रिक अॅसिड प्रामुख्याने ब्लड व्हेसल वॉल सुरळीत करण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.